Pune ACB Trap | अडीच लाखाच्या लाच प्रकरणी बारामतीतील लघु पाटबंधारे विभागाचा इंजिनियर ‘गोत्यात’, रक्कम शिक्षकाने घेतली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap | अडीच लाख रूपयाच्या लाच प्रकरणी बारामतीमधील (Baramati) लघु पाटबंधारे विभागातील अधिकारी इंजिनियर संदीप गोंजारी (Sandeep Gonjari) हे गोत्यात आले आहेत (Pune Birbe Case). त्यांचा साथीदार रणजीत प्रकाश सूर्यवंशी Ranjeet Prakash Suryawanshi (वय – 40, शिक्षक) यांनी लाचेची रक्कम बारामतीमधील जळोची रोड येथे स्विकारली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या भूसंपादन केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदल्याचा प्रस्ताव प्रांत कार्यालय येथे पाठविल्याचा मोबदल म्हणून आरोपी संदीप गोंजारी यांनी तक्रारदाराकडे तडजोडीअंती अडीच लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती.
ती रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आरोपी रणजीत प्रकाश सुर्यवंशी यांना जळोचा रोड येथे
ताब्यात घेण्यात आले आहे (Baramati ACB Trap). त्यामुळे इंजिनियर संदीप गोंजारी हे गोत्यात आले आहेत.

पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अप्पर अधीक्षक सुरज गुरव
(Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राम शिंदे (PI Ram Shinde),
विरनाथ माने (PI Virnath Mane), कर्मचारी प्रविण तावरे, सौरभ महाशब्दे,
चालक पोलिस अभिजीत राऊत यांच्या पथकाने ही सापळा कारवाई यशस्वी केली आहे.

Web Title : Pune ACB Trap | Pune Bribe Case Engineer Sandeep Gonjari Teacher Ranjeet Prakash Suryawanshi In Trouble Baramati ACB Trap

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Imtiyaz Jaleel | एमआयएमचे खासदार इम्‍तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल

Pune Crime News | बलात्कार करुन ब्लॅकमेल करुन जबरदस्तीने केले लग्न; नांदण्यासाठी येण्यासाठी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

Nashik ACB Trap | नाशिक भूमि अभिलेखचे आणखी दोन अधिकारी आणि खासगी एजंट अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पुण्यातील कुख्यात गुंड सचिन माने व त्याच्या 13 साथीदारांवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची 16 वी कारवाई

Kushal Badrike | कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाला “नात्यांची, स्वप्नांची नुसती राख…”