Pune Accident-Crime | बारामतीजवळ झालेल्या भीषण अपघातात सराफ व्यावसायिकाच्या कुटुंबातील तिघे जागीच ठार; अश्विनी भंडारी, मिलिंद भंडारी आणि कविता शहा यांचा समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident-Crime | ऊसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून भरधाव आलेल्या मोटारीने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बारामतीतील सराफ व्यावसायिकाच्या कुटुंबातील तिघे ठार झाले. हा अपघात पुणे -बारामती रस्त्यावर (Pune-Baramati Road) तरडोली गावाजवळ मंगळवारी रात्री उशिरा झाला.

अश्विनी श्रेणिक भंडारी (वय ४८), मिलिंद श्रेणिक भंडारी (वय २४), कविता उदय शहा (वय ६२, सर्व रा. सुभाष चौक, बारामती) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. तर बिंदिया सुनिल भंडारी या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

बारामतीतील सराफ व्यावसायिक श्रेणिक भंडारी यांचे कुटुंबीय एका धार्मिक कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. रात्री कार्यक्रम संपवून ते बारामतीला परत जात होते. यावेळी तरडोलीपासून पुढे आल्यानंतर ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अंदाज न आल्याने वेगात असलेल्या कारने ट्रॉलीला मागून जोरात धडक दिली (Pune Accident-Crime). ही धडक इतकी जोरात होती की, त्यात तिघांचा जागीच मृत्यु झाला. अपघातातील जखमींना पुण्यात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या घटनेने बारामतीत शोककळा पसरली आहे.

Web Title : Pune Accident-Crime | major accident in baramati three died on the spot pune accident crime

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा

 

Vitamin And Mineral For Health | इम्यूनिटी, हाडे, मेंदू आणि डोळे मजबूत बनवतात व्हिटॅमिन A,B,C,D; ‘हे’ मिनरल सुद्धा आवश्यक, जाणून घ्या

Uric Acid | तुमच्या शरीरात होत असेल ‘ही’ समस्या, तर यूरिक अ‍ॅसिड वाढल्याचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

Covid-19 vs Influenza | सर्दी-ताप, डोकेदुखीची लक्षणे ‘कोविड’ची आहेत की ‘फ्लू’ची, हे कसे ओळखावे? जाणून घ्या