Pune Accident | कॅमेरात कैद झाल्या ठिणग्या; पुणे-अहमदनगर महामार्गावर एक भयानक अपघात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे-अहमदनगर महामार्गावर (Pune-Ahemadnagar Highway) सणसवाडी इथे एक भयानक अपघात (Pune Accident) घडला आहे. पुणे- नगर महामार्गावर सणसवाडी येथे एका भरधाव इंडीव्हर कारने दुचाकीला जोराची धडक (Pune Accident) दिली. धडक बसल्यानंतर दुचाकीस्वार खाली पडला. त्यानंतरही चारचाकी (Four Wheeler) चालकाने कार थांबवली नाही. त्यानंतर दुचाकीला फरफटत नेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला.

दुचाकी रस्त्यावरुन फरफटत जात असताना महामार्गावर आगीच्या ठिणग्या उडाल्या. हा संपूर्ण प्रकार महामार्गाच्या बाजूला असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्ही (CCTV Camera) कॅमेऱ्यात कैद झाला. दुचाकीस्वार (Two Wheeler) हा गंभीर जखमी असून त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पुणे अहमदनगर महामार्गावर अपघात घडत आहेत.
या वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
पुण्यात इतर ठिकाणीही अपघातांचे प्रमाण वाढत असून जपून गाडी चालवण्याची विनंती केली जात आहे.

Web Title :- Pune Accident | hit and taken away by a car accident on pune ahmednagar highway

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यातील बुधवार पेठीतील क्रांती चौकात दोन गटांत कोयत्याने मारामारी

Jitendra Awhad | जामीन मिळताच आव्हाडांची प्रतिक्रिया; “…मला संपवण्यासाठी ठरवून”

Pune DCP Internal Transfer | पुणे पोलीस आयुक्तालयात नव्याने हजर झालेल्या 7 पोलीस उपायुक्तांच्या नियुक्त्या तर 2 उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या