Pune Accident News | भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, वाकड पुलावरील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident News | भरधाव वेगातील अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. जखमी तरुणावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.2) पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास वाकड पुलावर वॉशिंग सेंटर समोर घडली. (Pune Accident News)

अतुल संजय कागणे (वय-24 मुळ रा. राणी पुरा, होळी चौक, व्हि.टी.सी. दोंडाईचा, धुळे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक सुनील पांडुरंग काटे (वय-36) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर आयपीसी 304(अ), मोटार वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल कागणे हा त्याच्या दुचाकीवरुन (एमएच 18 सी.बी.1533) जात होता. वाकड ब्रीजवर चैतन्य वॉशिंग सेंटर समोर भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे, हयगयीने चालवून अतुल याच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये अतुल दुचाकीवरून रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला व अंगाला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झाल्याने त्याला औंध हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत माने करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

नायजेरियनाकडून अमली पदार्थ आणुन विकणार्‍या दोघांना अटक

Maharashtra Police News | पोलीस सेवेत उत्कृष्ट कामगिरी केलीय; मग पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्हासाठी अर्ज केलात का

Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळवर गोळीबार करणार्‍यांनी दिल्या गुंडाच्या नावाने घोषणा; मामाच्या वादाचा बदल्याबाबत पोलिसांना संशय

Creative Foundation Pune | साधनांची कमतरता नाही गरज संस्कारक्षम पिढी घडविण्याची – चंद्रकांत पाटील

Pune Police Mcoca Action | मुंढवा परिसरात दहशत पसरवणाऱ्या सुमित उर्फ लखन गौड टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 112 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

भांडण सोडवणाऱ्या तरुणाला काचेच्या बाटलीने मारहाण, तिघांवर FIR; हिंजवडी मधील घटना