Pune Accident News | डोळ्यासमोर पती आणि 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, पाबळ-शिरुर रोडवर ट्रक दुचाकीचा भीषण अपघात

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident News | ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत बाप लेकाचा मृत्यू (Father – Son Death) झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात पाबळ शिरुर रोडवर (Pabal Shirur Road) खैरेनगर जवळ झाला. या अपघातात (Pune Accident News) भाऊसाहेब काळूराम चौधरी (वय-43) व अश्विन भाऊसाहेब चौधरी (वय-8 रा. खैरेनगर, ता. शिरुर) या बापलेकांचा जागीच मृत्यू झाला तर अनिता भाऊसाहेब चौधरी (वय-35) गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात (Shikrapur Police Station) अमोल सुदाम कदम या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरुर खैरेनगर पाबळ रस्त्याने भाऊसाहेब चौधरी (Bhausaheb Chaudhary) रात्रीच्या सुमारास दुचाकीवरुन पत्नी व मुलासह जात होते. हॉटेल बैठक समोर पाठिमागून आलेल्या ट्रकची चौधरी यांच्या दुचाकीला धडक बसली. यामध्ये भाऊसाहेब व मुलगा अश्वीन (Ashwin Bhausaheb Chaudhary) रस्त्यावर पडले. तर पत्नी अनिता (Anita Bhausaheb Chaudhary) रस्त्याच्या बाजूला पडल्या. यावेळी ट्रकचे चाक दोघांच्या अंगावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी पोलिसांनी चालकाची चौकशी केली असता तो मद्यपान केल्याचे आढळून आले. (Pune Accident News)

घटनेबाबत गणेश शंकर चौधरी Ganesh Shankar Chaudhary
(वय 53 रा. खैरेनगर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे
फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी अमोल सुदाम कदम (वय 30 रा. चांडोली ता. खेड जि. पुणे)
या ट्रक चालकावर सदोश मनुष्यवधाचा गुन्हा (FIR) दाखल करुन त्याला
अटक (Arrest) केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर
(PI Pramod Kshirsagar) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार
(API Vaibhav Pawar) हे करत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा