Pune Accident News | भरधाव वेगातील कार पलटून भीषण अपघात; 3 ठार तर 1 जखमी

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Accident News | राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अशातच पुण्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे कारचा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कारने पलटी खाल्ल्यामुळे हा अपघात झाला आहे. संदीप राजाभाऊ माळी (वय 35), बालाजी केरबा तिडके (वय 48) आणि सरस्वती राजाभाऊ माळी (वय 61) अशी या अपघातामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. हे तिघेही लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या अपघातात चंद्रकांत रामकिशन गवळी (वय 54) हे गंभीर जखमी झाले आहेत. (Pune Accident News)

काय घडले नेमके?
शुक्रवारी पहाटे पावणेचारच्या दरम्यान पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पुणे या लेनवर इंदापूर तालुक्यातील डाळज नं. 1 गावाच्या हद्दीत ही अपघातग्रस्त स्विफ्ट कार (क्र. एम एच 43 बी एन 1402) वेगाने जात होती. गाडीचा वेग खूपच जास्त होता. त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कारने तीनवेळा पलटी मारली. भिगवण बस स्थानकापासून काही अंतरावर हा अपघात झाला. (Pune Accident News)

हा अपघात एवढा भीषण होता कि, या अपघातामध्ये कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातातील जखमीला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत व्यक्तींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. इंदापूर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Web Title :-Pune Accident News | pune major road accident 3 died one injured near bhigvan indapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Akola Crime News | धक्कादायक ! सैन्य दलात असलेल्या पतीने पत्नीचा गळा चिरला; नंतर स्वतःच सासूला फोन करुन दिली माहिती

Prajakta Mali | अखेर अभिनेत्री प्राजक्ता माळी लग्नासाठी तयार झाली; मात्र घातली ‘ही’ अट

Devisingh Shekhawat Passed Away | माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे पुण्यात निधन