Pune Accident News | पुणे : हॉस्पिटलमध्ये वडिलांचा जेवणाचा डाबा देण्यासाठी गेला, गाडी स्लीप झाल्याने जीव गमावला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident News | हॉस्पिटलमध्ये वडिलांना जेवणाचा डबा देऊन घरी परत येत असताना दुचाकी स्लीप झाली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या युवाकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बबलू हरिप्रसाद वर्मा (वय-38 रा. घोरपडीगाव, पुणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत पोलीस हवालदार सचिन लक्ष्मण मेमाणे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन मयत बबलू वर्मा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सडेसहा वाजण्याच्या सुमारास घोरपडीगाव येथील अनंत टॉकीज समोर घडला.(Pune Accident News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार बबलू महंमदवाडी येथील देसाई हॉस्पिटलमध्ये वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी गेला होता. डबा दिल्यानंतर तो घरी परत येत असताना अनंत टॉकीज समोर त्याची दुचाकी स्लीप होऊन तो पडला. त्याच्या हाताला, तोंडाला व डोक्याला मार लागून किरकोळ दुखापत झाली. त्याकडे दुर्लक्ष करुन त्याने दवाखान्यात उपचार घेतले नाहीत.

दरम्यान, त्याची डावी बाजू थंड पडू लागल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
त्याच्या डॉक्यावर शस्त्रक्रिया करुन आयसीयूमध्ये उपचार सुरु करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
बबलू वर्मा याने वहतुकीच्या नियमांचे पालन न करता बदरकारपणे वाहन चालवून स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे.
पुढील तपास मुंढवा पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amravati-Nagpur National Highway | धावत्या ट्रॅव्हल बसवर सिनेस्टाईल गोळीबार, ४ प्रवाशी जखमी, महाराष्ट्रातील महामार्गांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Uddhav Thackeray On Eknath Shinde | पक्ष फोडणे ही तुमचा नालायकपणा सिद्ध करणारी वृत्ती…, वायकरांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर ठाकरेंचा हल्लाबोल!

Prakash Ambedkar On Mahavikas Aghadi | तुम्ही आपआपले उमेदवार जाहीर करताय, हे तुम्हाला मान्य आहे का? वंचितने व्यक्त केली जाहीर नाराजी