Uddhav Thackeray On Eknath Shinde | पक्ष फोडणे ही तुमचा नालायकपणा सिद्ध करणारी वृत्ती…, वायकरांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर ठाकरेंचा हल्लाबोल!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Uddhav Thackeray On Eknath Shinde | हे फक्त पक्ष फोडत आहेत. पण पक्ष फोडणे म्हणजे काही हिंदुत्व नाही. ही तुमचा नालायकपणा सिद्ध करणारी वृत्ती आहे. कारण तुम्ही आजपर्यंत काहीच केले नाही. आजही माझे आव्हान आहे त्यांना की, लोकसभेबरोबर महापालिका आणि विधानसभेचीही निवडणूक घ्या. एकदाच काय तो तुमचा खात्मा करून टाकतो. तुम्हालाही त्रास नाही आणि आम्हालाही त्रास नाही, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा (BJP) आणि शिंदे गटाला दिले.

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी रविवारी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यानंतर गोरेगाव येथील सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी हा हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, वन नेशन, वन इलेक्शन घ्या. एकदाच काय तो तुमचा फडशा पाडून टाकतो. दोन वर्षं झाल्यानंतरही महापालिका निवडणुका घेण्याची यांची हिंमत नाही.(Uddhav Thackeray On Eknath Shinde)

एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र डागताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसैनिकांचे प्रेम खोक्यातून मिळत नसते.
शिवसेनेच्या मुळावर कुणी घाव घालत असताना हा शिवसैनिक गप्प बसेल का? गद्दारांचे नशीब आहे की आज
शिवसेनाप्रमुख नाहीत. नाहीतर यांची कधीच वाट लागली असती. मी थोडा संयमी आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी लढणारच नाही. पण तुम्हाला काढून टाकण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे.

देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातमध्ये गेल्यावर विरोधकांनी
टीका केल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की गुजरात म्हणजे काही पाकिस्तान नाही. गुजरात आमचाच आहे.
पण देवेंद्रजी, गुजरात म्हणजे पाकिस्तान नसेल तर मग महाराष्ट्र म्हणजे काय पाकिस्तान आहे का?

भाजपाला आव्हान देताना ठाकरे म्हणाले, मला भाडोत्री जनता पक्षाला सांगायचे आहे की, आजपर्यंत तुम्ही आमची
मैत्री पाहिली. आता जरा मशालीची धग बघा तुमच्या खुर्चीचे बुड कसे जाळून टाकते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

उमेदवारी मिळण्याची शक्यता संपली, वायकरांपाठोपाठ काँग्रेसचे निरुपम देखील शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता