Pune : व्यावसायिक तरूणाचे अपहरण करून खंडणीची मागणी करणार्‍या दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात ऑनलाइन क्रिकेट आणि टेनिस बेटिंग प्रकरणातून मार्केटयार्ड भागातील एकाचे अपहरण केल्यानंतर त्याच्याकडून 3 लाख रुपयांचा पहिला हप्ता घेत असताना खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली आहे.

अमोल रमाकांत एकबोटे (वय २९, रा. बाणेर) व सौरव पांडुरंग माने (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात IPC 365, 384, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 30 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुण हा मार्केटयार्ड परिसरात राहतो. तो व्यवसायिक आहे. यातील आरोपींनी तक्रारदार तरुणाचा लोटस ॲपवरील (क्रिकेट -टेनिस – कॅसिनो) ऑनलाईन बेटिंग गेम खेळण्यास पासवर्ड व लॉगिन आयडी घेतला होता. यावेळी या तरुणाच्या खात्यावर 1 हजार पॉइंट होते. या पॉईंटचा वापर केला आणि त्यावरून आरोपी दोघे हा गेम खेळले. त्यातून त्यांना 30 हजार पॉइंट मिळवले. या 30 हजार पॉईंटच्या बदल्यात 30 लाख रुपये खंडणी मागितली. त्यातूनच तक्रारदार तरुणाचे जबरदस्तीने अपहरण करत त्याला खेड शिवापूर येथे नेले त्यानंतर, त्याला दमदाटी करत आठवड्याला 3 लाख रुपये देण्याचे व्हॉटसअप मेसेज जबरदस्तीने त्याच्याकडून करून घेतले होते. यानंतर त्याला सोडले. यानंतर तरुणाने पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकात येऊन तक्रार दिली होती. त्यानुसार पथकाने चौकशी करत तपासाला सुरूवात केली. 30 लाखामधील 3 लाख रुपयांचा पहिला हप्ता घेत असताना पथकाने या दोघांना ताब्यात घेतले. वानवडी येथील सपना पावभाजी सेंटरजवळ या दोघांना पकडले. त्यांची चौकशी करत गुन्हा दाखल करून अटक केली.

पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, कर्मचारी प्रदिप शितोळे, विनोद साळुंखे, शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, संग्राम शिनगारे, प्रवीण पडवळ, अमोल पीलाने, प्रदिप गाढे, चेतन शिरवळकर, कर्णवर, कोळेकर यांच्या पथकाने केली.