Pune APMC Elections | कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकीसाठी 28 आणि 30 एप्रिल रोजी मतदान

पुणे : Pune APMC Elections | राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत (Maharashtra State Cooperative Election Authorities) राज्यातील निवडणूकीस पात्र कृषि उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक (Pune Krushi Utpanna Bazar Samiti Elections) प्रक्रिया सुरु असून याअंतर्गत १४७ बाजार समित्यांचे मतदान २८ एप्रिल तर ८८ बाजार समित्यांचे मतदान ३० एप्रिल रोजी होणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी.एल. खंडागळे ( Dr. P. L. Khandagale) यांनी दिली आहे. (Pune APMC Elections)

प्राधिकरणाने २१ मार्चच्या आदेशानुसार २५३ कृषि उत्पन्न बाजार समित्याची निवडणूक प्रक्रिया सुरू केली होती. त्यतील १८ बाजार समित्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. उर्वरित २३५ बाजार समित्यांसाठी मतदान होणार आहे. (Pune APMC Elections)

या निवडणुकीअंतर्गत एकूण ४ हजार ५९० जागा निवडून द्यायच्या होत्या.
त्यापैकी सहकारी संस्थांच्या मतदार संघामध्ये २ हजार ८०५ पदांपैकी १८ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित
जागांसाठी ६ हजार २३० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ग्रामपंचायतींच्या मतदार संघात १ हजार २० पदांपैकी
२१ जागा बिनविरोध झाल्या असून २ हजार ४५७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. व्यापारी/अडते मतदार संघात
५१० पदांपैकी ४९ बिनविरोध तर उर्वरित जागांसाठी १ हजार ५२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
हमाल/मापारी मतदार संघामध्ये २५५ पदांपैकी ६४ जागा बिनविरोध झाल्या असून ६०६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

२८ एप्रिल रोजी मतदान होणाऱ्या १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी ३७ बाजार समित्यांची मतमोजणी
२८ एप्रिल रोजी, ९५ समित्यांची मतमोजणी २९ एप्रिल रोजी तर १५ समित्यांची मतमोजणी १ मे रोजी होणार आहे.
८८ पैकी ७८ समित्यांची मतमोजणी ३० एप्रिल रोजी तर १० समित्यांची मतमोजणी १ मे रोजी होणार आहे,
असेही डॉ. खंडागळे यांनी कळविले आहे.

Web Title :-  Pune APMC Elections | Pune : Polling on April 28 and 30 for the election of Krushi Utpanna Bazar Samiti

Join our WhatsApp Group, Telegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘भाकरी फिरवण्याची वेळ आली’ शरद पवारांच्या विधानाचा अर्थ काय? अजित पवारांनी सांगितलं…

Pune PMPML Bus News | कोथरूड स्टँड ते हिंजवडी माण फेज-3 आणि सांगवी गाव ते सिम्बायोसिस हॉस्पिटल लवळे या 2 नवीन मार्गावर पीएमपीची बससेवा, जाणून घ्या मार्ग

Ajit Pawar | राज ठाकरेंच्या सल्ल्याला अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले-‘जसे त्यांनी त्यांच्या काकांकडे…’