
Ajit Pawar | राज ठाकरेंच्या सल्ल्याला अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले-‘जसे त्यांनी त्यांच्या काकांकडे…’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) आणि अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी एका कार्यक्रमात मुलाखत घेतली. या मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी काही नेत्याची नावे घेत तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल असा प्रश्न विचारला होता. त्यात अजित पवार (Ajit Pawar) यांना तुम्ही काय सल्ला द्याल असा प्रश्न राज ठाकरेंना विचारला होता.
अजित पवारांना (Ajit Pawar) कोणता सल्ला देणार असे विचारले असता, राज ठाकरे यांनी मला अजित पवारांबाबत पाच तारखेच्या सभेत सविस्तर बोलायचेय. बाहेर जेवढे लक्ष देतायत त्यापेक्षा जास्त काकांवर लक्ष ठेवा असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला. यावर पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिले. त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पवार म्हणाले, राज ठाकरेंनी जसं त्यांच्या काकांकडे लक्ष ठेवले तसे मीदेखील माझ्या काकांकडे लक्ष ठेवेन, असं उत्तर अजित पवारांनी दिलं.
प्रसंग पाहून भाकरी फिरवली
गेल्या 50-60 वर्षाच्या राजकीय जीवनात शरद पवारांनी (NCP Chief Sharad Pawar) काही प्रसंग पाहून भाकरी फरिवण्याचे काम केलंय, नवे लोक पुढे आले आहेत हे सगळ्यांनी पाहिलेय, आम्हाला संधी मिळाली आम्ही काम करुन दाखवलं. नवीन कार्यकर्ते आले पाहिजेत, नवे चेहरे आले पाहिजेत. पक्षातील पदाधिकारी असताना त्यात नवे चेहेरे आले पाहिजेत. नवीन लोक पुढे येत आहेत. काहीजण वयस्कर झाल्यावर बाजूला जातात, या घटना घडत राहतात, असं अजित पवार म्हणाले.
काय म्हणाले शरद पवार?
आता भाकरी फिरवण्याची वेळ आली असून तव्यावरची भाकरी फिरवावी लागते, ती फिरवली नाही तर करपते,
त्यामुळे भाकरी फिरवण्यास विलंब करुन चालणार नाही. समाजात काही व्यक्तिंना पद असो अथवा नसो मात्र
त्यांना कार्यकर्त्यांमध्ये सन्मान असतो. तो सन्मान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पुढील पायरीवर जाण्याची तयारी
ठेवली पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले.
Web Title :- Ajit Pawar | ajit pawars reply to raj thackerays advice in one sentence everyone started laughing
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update