पुणे : हॉस्टेलमधील मुलींचे अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढणारा गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कोथरुड येथील पाळणाघरात तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच, एका हॉस्टेलमधील मुलींचे अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्याला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार भेलकेनगर येथील मुलींच्या हॉस्टेलमध्ये शुक्रवारी (दि.३१ ऑगस्ट) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला आहे.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ecae374a-ae05-11e8-a21d-3f16abcfae51′]

शरद आण्णासाहेब दरेकर (वय-२९ रा. मुपो. करंदीपिंपळे, जगताप रोड, ता. शिरुर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर याप्रकरणी २५ वर्षीय तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शरद दरेकर हा सनदी लेखापाल अभ्यासक्रम करीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने व्हिडीओ काढण्यासाठी मोबाइल हातात ठेवून बाथरुमध्ये धरला. तेवढ्यात फिर्यादी यांनी त्याला पकडले. ही बाब हॉस्टेलच्या मुलींना ताबडतोब पोलिसांनी कळवली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी हा सकाळच्या वेळी बाथरुम शेजारी थांबत असे व हॉस्टेलमधील मुली आंघोळ करण्यासाठी आल्या असता त्यांची मोबाइलमध्ये शुटींग करीत असे. ही बाब एका विद्यार्थीनिच्या लक्षात आल्याने शुक्रवारी आरोपीला रंगेहात पकडण्यात आले. पुढील तपास कोथरूड पोलीस करीत आहेत.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी