Pune : मित्राच्या बहिणीला शिवीगाळ केल्यावरून तरूणावर कोयत्याने सपासप वार, चतुःश्रृंगी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मित्राच्या बहिणीला शिवीगाळ केल्याच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने वार केल्याचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात अजय बेल्लम (वय 25, रा. जनवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राकेश तांबे (वय 17) या तरुणाने तक्रार दिली आहे. यात राकेश हा जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहे. बुधवारी रात्री फिर्यादी हा घराच्या बाहेर उभा होता. त्यावेळी आरोपी अजय येथे आला. तसेच त्याने “तू माझ्या मित्राच्या बहिणीला काल शिवीगाळ का केली” असे विचारणा केली. तर शिवीगाळ करत हातातील कोयत्याने फिर्यादीवर वर केला. तो वार डाव्या कानाच्यावर व उजव्या हाताच्या अंगठ्याला लागला. त्यामुळे तो थोडक्यात बचावला. पण यात तो जखमी झाला आहे. यावेळी फिर्यादीची बहिण त्याला सोडवण्यासाठी आली. तर आरोपीने तिलाही शिवीगाळ केली. अधिक तपास चतु:शृंगी सुरू आहे.