Pune : हडपसर परिसरात 6 जणांकडून दोघांवर कोयत्याने सपासप वार करून खुनाचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसर भागातील दोन गटातील वाद कडक लॉकडाऊन सुरू असताना सुरूच असल्याचे दिसत असून, पुन्हा 6 जणांच्या टोळक्याने दोन तरुणावर कोयत्याने सपासप वार करत त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हडपसर परिसर कायमच सुरू असलेल्या या गुन्हेगारी कृत्याने दहशतीत आहे. नागरिकाकडून यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

याप्रकरणी केतन मकाळ (वय 22,रा. माळवाडी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजन लवांडे (वय 19), प्रकाश घाडगे (वय 22), संदेश कुंभार (वय 21), विशाल आकारे (वय 19), संकेत काळे (वय 22) व ओंकार उभाळे यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे एकाच परिसरातील आहेत. त्यांच्यात पूर्वीचे वाद आहेत. यादरम्यान फिर्यादी आणि त्याचा मित्र येथील कॅनॉल येथे बसले असता आरोपी हातात कोयते घेऊन आले. त्यांनी पूर्ववैमनस्यातून त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच, यानंतर फिर्यादी याच्या मित्रावर कोयत्याने सपासप वारकरून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.