Pune : तुझी बहीण आम्हाला भिकारी म्हणाली, तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – जेवत्या ताटावरून तरुणाला मित्रांनी घेऊन जात असताना त्यांच्या बहीनीने त्यांना विरोध केल्यानंतर त्या मित्राने त्याला सिमेंटच्या ब्लॉकने डोक्यात मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. त्याला घेऊन जाताना तेच मित्र त्याला हा माझा भाऊ आहे, असे म्हणून घेऊन गेले. पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

आकाश चंद्रकांत महापुरे (वय 19, मुंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर या घटनेत दिनेश गायकवाड (वय 28) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत दिनेशची आई अंजली गायकवाड (वय 66) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी शेजारी राहण्यास आहेत. दोन दिवसांपूर्वी आरोपी आकाश हा फिर्यादीच्या घरी आला. तसेच दिनेश याला बाहेर जायचे म्हणून घेऊन निघाला. यावेळी दिनेश जेवण करत होता. तो जेवत्या ताटावरून उठला आणि त्याच्यासोबत निघाला. यावेळी दिनेश याच्या बहिणीने अरे भिकाऱ्यासारखा कुठे जातोय असे म्हणून त्याला हटकले. याचा राग आरोपीला आला. त्याने दिनेशच्या बहिणीशी वाद घातला आणि हा माझ्या भावा सारखा आहे, असे म्हणून त्याला नेले. त्यानंतर त्यांनी बाहेर नेहून तुझी बहीण आम्हाला भिकारी म्हणली अशी म्हणून वाद घातला. तसेच त्याच्या डोक्यात सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात दिनेश हा गंभीर जखमी झाला आहे. अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहेत.