Pune : पुण्यात 45 हजारांना रेमडेसिवीर इंजेक्शन विकण्याचा प्रयत्न, दोघांविरूध्द FIR

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गरजुला एक रेमडेसिवीर इंजेक्शन 45 हजाराला विक्री करताना पोलिसांनी एकाला पकडले आहे. विक्री करणाऱ्याचे वडील काही दिवसांपूर्वी कोरोनाने आजारी असल्याने डॉक्टरांनी त्यांना 4 इंजेक्शन आणण्यास सांगितले होते. त्यातील हे एक इंजेक्शन होते. याप्रकरणी औषध निरीक्षक श्रुतिका कमलसिंग जाधव (वय 42) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओमकार भरत पवार व देवेंद्र काळूराम चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार याचे वडील काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होते. यावेळी त्यांना डॉक्टरांनी रेमडेसिवीर चार इंजेक्शन आणण्यास सांगितले होते. ओमकार यांनी अथक प्रयत्न करून चार इंजेक्शन मिळवले. डॉक्टरांनी मागितल्यावर त्यांनी इंजेक्शन दिले. पण, त्यातील एक इंजेक्शन शिल्लक राहिले होते. त्यामुळे त्यांनी ते विक्री करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी देवेंद्र चौधरी यांनी हे इंजेक्शन विक्री करून देण्याचे सांगितले. देवेंद्र याने हे इंजेक्शन एका तरुणाला 45 हजार रुपयांना विक्री करण्याचा प्रयत्न केला. अधिक तपास पोलीस करत आहेत.