Pune Aundh Crime | केबल टाकणाऱ्या कामगारांवर कोयत्याने वार, औंध परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Aundh Crime | औंध परिसरातील डी.पी. रोडवर (Aundh DP Road) केबल टाकण्याचे काम करणाऱ्या कामगाराला शिवीगाळ करुन कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshrungi Police Station) चार जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.28) पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत प्रकाश बासु राठोड (वय-21 रा. शांतीनगर, भोसरी) याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन ओम विजय पाटील Om Vijay Patil (वय 21), अनिकेत अनिल उमाप Aniket Anil Umap (वय -21) याच्यासह दोन अल्पवयीन मुलांवर आयपीसी 307, 323, 504, 34 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ओम आणि अनिकेत यांना अटक केली आहे तर अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे सहकारी नवीन राठोड, व्यंकेश चव्हाण, नितीन राठोड, अभिषेक चिन्ना राठोड, मिथुन पवार हे औंध येथील डीपी रोडवर केबल टाकण्याचे काम करत होते. दरम्यान, आपल्याला कोणीतरी मारण्यासाठी येणार असल्याचे आरोपींना समजले. त्यामुळे आरोपी डीपी रोडने जात असताना त्यांना फिर्यादी व त्यांचे सहकारी दिसले.

आरोपींच्या हातात कोयते असल्याने फिर्यादी व त्यांचे इतर सहकारी घाबरून पळून जाऊ लागले.
हेच लोक आपल्याला मारण्यासाठी आल्याचा गैरसमज आरोपींचा झाला.
त्यामुळे त्यांनी अभषेक याला पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जमिनीवर पाडले.
त्यानंतर हातातील कोयत्याने अभिषेक याच्या डोक्यावर, हातावर व पायावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न
केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prakash Ambedkar On Lok Sabha Election 2024 | प्रकाश आंबेडकरांकडून नव्या समीकरणाचे संकेत, म्हणाले ”महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरूवात…”

Pune Sadashiv Peth Crime | सदाशिव पेठेतील आणखी एका मंदिरात चोरी, दानपेटीतून रोकड लंपास