Pune : कोंढव्यात ग्रीन पार्क परिसरात टोमणा मारल्याच्या कारणावरून लोखंडी पाईपने मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोंढव्यात ग्रीन पार्क परिसरात केवळ टोमणा मारल्याच्या कारणावरून एकाला लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली आहे. सात जणांच्या टोळक्याने मारहाण केली असून, यात तरुण गंभीर जखमी झाला आहे.

याप्रकरणी उमर, अहमद, रफीक, अमजद, नासीर, आयुब, आणि शेरखान नावांच्या संशयीत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अस्लम राजू शेख यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख हे त्यांची रिक्षा घेऊन जात होते. फिर्यादी व त्याचे चार मित्र तसेच आरोपी उमर त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. फिर्यादीने यावेळी बोलत बोलत “तुम्हाला शेरखानच्या मागे पुढे करण्याची सवय लागली असल्याचा” टोमना मारला. याच कारणावरून आरोपींनी लोखंडी पाईपने मारहाण करून त्यांच्या रिक्षाची तोडफोड केली.

व्हिडीओ गेमच्या पैशाच्या वादातून कोयत्याने वार

व्हिडीओ गेमच्या पैशाच्या वादातून एकाच्या मानेवर कोयत्याने वार केल्याचा प्रकार येरवडा परिसरात घडला आहे. याप्रकरणी अथर्व विशाल वाघ (१९) आणि फिरोज नसीर खान (१९, रा. दोघेही रा. सिध्दार्थनगर, येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनुराग अलोक पवार (१९, रा. साळवेनगर, यरेवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला.