Pune Bhidewada Smarak | ऐतिहासिक भिडे वाडा सरकारजमा, सोमवारी रात्री 11 वाजता कडेकोट बंदोबस्तात इमारत घेतली ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- पुणे महापालिका (Pune Municipal Corporation (PMC) आणि पोलिसांनी (Punbe Police) काल रात्री अकरा वाजताच्या सुमारास भिडे वाड्याची (Pune Bhidewada Smarak) इमारत ताब्यात घेण्याची कारवाई केली. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी बुधवार पेठेतील भिडे वाड्यात (Pune Bhidewada Smarak) १८४८ मध्ये मुलींची पहिली शाळा सुरु केली होती, म्हणून या वास्तूला ऐतिहासिक महत्व आहे. मोडकळीस आलेला हा वाडा रात्री जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आला. फुले दाम्पत्याच्या राष्ट्रीय स्मारकासाठी हे महत्वाचे पाऊल ठरले आहे.

फुले दांपत्याच्या कार्याचे जतन करण्यासाठी वाड्यात राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा ठराव पुणे महापालिकेने (Pune PMC News) केला होता. मात्र, जागा ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेत मोठे अडथळे आणले गेले. हाय कोर्टात यासंबंधिचा खटला १३ वर्षे सुरू होता. हाय कोर्टाने पुणे महापालिकेच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर येथील भाडेकरू सुप्रिम कोर्टात गेले. मात्र, सुप्रिम कोर्टाने हाय कोर्टाचा निर्णय कायम ठेवत भिडे वाड्याची जागा एका महिन्याच्या आत महापालिकेकडे सुपूर्द करण्याचे आदेश जागामालक व भाडेकरूंना दिले.

जागामालक आणि भाडेकरूंना सुप्रिम कोर्टाने दिलेली मुदत ३ डिसेंबरला संपल्यानंतर महापालिकेने काल ४ तारखेला रात्री पोलिस बंदोबस्तात भूसंपादनाची प्रक्रिया पार पाडली.

रात्री साडेनऊ वाजल्यापासून भिडे वाड्याच्या ((Pune Bhidewada Smarak) परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
रात्री पावणे अकराच्या सुमारास पुणे महापालिकेच्या विविध क्षेत्रिय कार्यालयामधून सुमारे ५० कामगारांनी हातोडी पहार, कटवणी, दोरी साहित्य घेऊन आले. रात्री ११ च्या सुमारात वाडा ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली. नंतर जेसीबीने वाड्याचे पाडकाम करण्यात आले. आता ही जागा महापालिकेने ताब्यात घेतली आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakane) यांनी म्हटले की, सुप्रिम कोर्टाने दिलेली मुदत
उलटून केल्याने महापालिकेने पोलिसांना भिडे वाडा ताब्यात घेण्याचे नियोजन केले.
रात्री पोलिसांनी ही वास्तू ताब्यात घेऊन महापालिकेकडे हस्तांतरित केली.
यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडताना नियमांचे पालन करण्यात आले आहे. ही कार्यवाही शांततेत पार पडली.

दरम्यान, महापालिकेने भिडे वाड्यामध्ये राष्ट्रीय स्मारक करताना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा
उचित गौरव करण्यासाठी स्मारकाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरु केले आहे.
तीन वास्तूविशारद यासाठी काम करत आहेत. लवकरच स्मारकाच्या कामाचे भूमीपूजन महापालिका प्रशासन करू शकते.

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि भूमीप्रापण विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील,
भूसंपादन विभागाचे उपायुक्त महेश पाटील उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Sindhudurg | पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण

CM Eknath Shinde On PM Modi | सिंधुदुर्गतील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधानांचे कौतुक, ”गॅरंटीचं दुसरं नाव मोदी”