CM Eknath Shinde On PM Modi | सिंधुदुर्गतील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधानांचे कौतुक, ”गॅरंटीचं दुसरं नाव मोदी”

सिंधुदुर्ग : CM Eknath Shinde On PM Modi | देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये लोकांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू पाहिली. या विजयासाठी मोदी यांचे अभिनंदन. हा नौदलाचा कार्यक्रम आहे. परंतु, हा कालच मिळालेला विजय आहे, त्याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. कालच्या निकालातून एक गोष्ट देशातल्या नागरिकांनी सिद्ध केली की, देशात गॅरंटीचे दुसरे नाव म्हणजे मोदी आहेत, अशी स्तुतीसुमने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde On PM Modi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर उधळली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) ज्या भूमीत मराठ्यांचे आरमार उभारले त्या कोकण भूमीत आज भारतीय नौदल दिन साजरा (Navy Day Event At Sindhudurg) झाला. सुरुवातीला नरेंद्र मोदी यांनी सिंधुदुर्गच्या समुद्रकिनारी राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ४३ फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले. यानंतरच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde On PM Modi) म्हणाले, जनता आणि त्यांची मने जोडणारे
पंतप्रधान महाराष्ट्रात आले आहेत. काल निवडणुकीच्या निकालात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट पाहिली.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या देशाचे नाव मोठे केले आहे. जगभरात सन्मान वाढवला आहे. आपल्या देशाची अर्थव्यवसथा बळकट केली आहे.

यावेळी भारतीय नौदलातील जवानांनी नौदलाच्या सामरिक सामर्थ्याचं दर्शन घडवले.
कार्यक्रमाला पंतप्रधानांसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | राऊतांचा EVM वर संशय, म्हणाले – ”लोकांच्या मनात शंका, एक निवडणूक बॅलेट पेपरने होऊन जाऊ द्या”

Harshvardhan Patil | पुणे : हर्षवर्धन पाटलांनी उघड केले सध्याचे घसरलेले राजकारण, ”कोणाचा करेक्ट कार्यक्रम…”

Pune Crime News | एकटेपणातून वृद्धाने उचललं टोकाचं पाऊल, कोथरुड परिसरातील घटना