Pune Bhidewada Smarak | पुणे महापालिकेने अवघ्या चोवीस तासात ऐतिहासिक भिडे वाडा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पुर्ण केली; मध्यरात्री धोकादायक वाडा पाडल्यानंतर आजही सर्वोच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना चपराक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Bhidewada Smarak | बुधवार पेठेतील (Budhwar Peth Pune) शिवाजी रस्त्यावरील (Shivaji Road Pune) ऐतिहासिक भिडे वाड्याची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) चोवीस तासात पुर्ण केली. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसार वाड्यातील मालक आणि भाडेकरूंना तीन डिसेंबरपर्यंत महापालिकेला वाड्याचा ताबा देण्याची मुदत संपल्यानंतर महापालिकेने मध्यरात्री वाड्याचे धोकादायक बांधकाम उतरवून अवघ्या चोवीस तासांच्या आतमध्ये पोलिसांमार्फत, जिल्हा भूसंपादन विभाग, महापालिकेचा भूसंपादन विभाग, मालमत्ता व्यवस्थापन विभाग आणि पुढे वाड्याचे पुननिर्माण करणार्‍या पालिकेच्या हेरिटेज विभागाच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया करून ‘कार्यक्षमतेची’ चुणूक दाखवून दिली. (Pune Bhidewada Smarak)

सर्वोच्च न्यायालयाने भिडेवाड्याची जागा एक महिन्याच्या आत महापालिकेच्या ताब्यात देण्याचे आदेश याचिकाकर्त्यांना दिले होते. त्याची मुदत ३ डिसेंबर रोजी संपली आहे. तत्पुर्वी भिडेवाड्यातील भाडेकरूंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करून जागा ताब्यात देण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ मागितली होती. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी याचिका दाखल करून घेण्यासंदर्भात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेण्यास नकार देत भाडेकरूंची याचिका फेटाळून लावली. (Pune Bhidewada Smarak)

सोमवारी सकाळी महापालिकेच्या भुसंपादन विभागाचे अधिकारी हे भिडेवाडा येथे जागा ताब्यात घेण्याची प्रक्रीया सुरु करण्यासाठी गेले होते. परंतु, भाडेकरूंनी विरोध केला होता. दरम्यान, सदर जागेचा पंचनामा करणे, भाडेकरूंना नोटीस देणे आदी कार्यवाही प्रशासनाने पुर्ण केली आहे. ही कार्यवाही पोलिस दंडाधिकार्‍यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. रात्री अकरा वाजल्यानंतर पोलिस बंदोबस्तामध्ये महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी भाडेकरूंनी दुकानांना लावलेल्या शटरची कुलुपे तोडून दुकाने मोकळी केली. हे काम सुरू असताना अगोदरच धोकादायक झालेल्या वाड्याचा बराचसा भाग कोसळला.

रात्री दोनच्या सुमारास राडारोडा उचलण्यास सुरूवात करण्यात आली. शिवाजी रस्त्यावरील वाहुकीमुळे कार्यवाहीत अडथळा ठरू नये यासाठी रात्रीच्यावेळी या परिसरातील शिवाजी रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली होती. जेसीबी यंत्र व साधारण १२ डंपरच्या मदतीने राडाराडा उचलण्यास सुरूवात करण्यात आली. परंतू पहाटेच्यावेळी गर्दी वाढू लागल्यानंतर राडाराडा उचलण्याची कारवाई थांबविण्यात आली. यानंतर वाडयाच्या भोवती रस्त्याच्या बाजूला पत्रे उभारून रस्त्याची साफसफाई करण्यात आली. उर्वरीत राडाराडा हटविण्याचे काम आज मध्यरात्री करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली. अत्यंत शांततेत झालेल्या या कार्यवाहीच्यावेळी स्थानीक नागरिक आणि कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाल्याची माहिती ढाकणे यांनी दिली. महापालिकेच्या भूसंपादन विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील, पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, महापालिकेचे उपायुक्त महेश पाटील, माधव जगताप आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिवाजी रस्त्यावर बुधवार पेठेतील भिडे वाडा येथे मुलींची पहिली
शाळा सुरू केली होती. या वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता.
या निर्णयाला जागामालक व पोटभाडेकरूंनी २०१०मध्ये पहिल्यांदा उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
उच्च न्यायालयाने या प्रकरणी असलेल्या याचिका निकाली काढून महापालिकेने यापूर्वी केलेल्या निवाड्यानुसार;
तसेच २०१३मधील कायद्यानुसार जागेचा मोबदला देण्याचे आदेश दिले. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजुने निकाल देताना या स्मारकास लागलेला १३ वर्षांचा
कालावधी योग्य नसल्याची टिप्पणी केली. हे स्मारक यापूर्वीच व्हायला हवे होते. न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याने दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये, असा प्रश्नही याचिकाकर्त्यांपुढे न्यायमूर्तींनी उपस्थित केला होता.
भिडेवाड्याची जागा एका महिन्याच्या आत महापालिकेच्या ताब्यात देण्यात यावी; अन्यथा महापालिकेने जबरदस्तीने
ती जागा ताब्यात घ्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने या सुनावणीदरम्यान दिले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | रुपाली चाकणकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर अश्लील पोस्ट करणारे सायबर पोलिसांच्या ताब्यात

Congress Nana Patole | शिंदे-फडणवीस-पवार सरकारने गुन्हेगारीत महाराष्ट्राला युपीच्या पंगतीत बसवले : काँग्रेस