Congress Nana Patole | शिंदे-फडणवीस-पवार सरकारने गुन्हेगारीत महाराष्ट्राला युपीच्या पंगतीत बसवले : काँग्रेस

मुंबई : मोदींची गॅरंटी व शिंदे, फडणवीस व अजित पवारांच्या सरकारने गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्राला उत्तर प्रदेशच्या पंगतीत बसवून नावलौकिकाला कलंक लावला आहे, अशी जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी केली. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो National Crime Records Bureau (एनसीआरबी – NCRB) ने २०२२ सालचा वार्षिक रिपोर्ट जाहीर केला. या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आल्यानंतर या आधारे काँग्रेसने (Congress Nana Patole) ही टीका केली आहे.

नाना पटोले म्हणाले, कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्र व मुंबईचा मोठा नावलौकिक होता, याला भाजपा सरकारने (BJP Govt) कलंक लावला. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महिला अत्याचार, खूनासारख्या गंभीर गुन्ह्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर महिलांसाठी देशात सर्वात सुरक्षित असलेले मुंबई शहर आता महिला अत्याचारांमध्येही दुसऱ्या क्रमांकावर आहे.

महायुती सरकारवर हल्लाबोल करताना नाना पटोले (Congress Nana Patole) म्हणाले, महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Govt) कटकारस्थान करून पाडून असंवैधानिक मार्गाने सत्तेत आलेल्या भाजप सरकारमधील आमदार, खासदारच गुंडगिरी करतात, गोळीबार करतात, हातपाय तोडण्याची धमकी देतात, लोकप्रतिनिधींनाही धमक्या देतात. अपहरणात महाराष्ट्र व मुंबईचा दुसरा क्रमांक आहे. राज्यातून महिला व मुली बेपत्ता होण्याच्या प्रकारात प्रचंड वाढ झालेली आहे.

एनसीआरबीच्या रिपोर्टची माहिती देताना नाना पटोले म्हणाले, महिला अत्याचारात राज्यात १५ टक्के वाढ झाली आहे. मुलांवरील अत्याचारात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात दर तासाला महिला अत्याचाराच्या पाच गुन्ह्यांची तर लहान मुलांवरील अत्याचारांच्या दोन गुन्ह्यांनी नोंद होत आहे. भाजपाची बेटी बचाव, योजना कागदावरच दिसत आहेत. प्रत्यक्षात परिस्थीती अत्यंत भयावह आहे हे अहवालावरूनही स्पष्ट होते.

नाना पटोले पुढे म्हणाले, महिला बेपत्ता प्रकरणी पोलीस महासंचालकांकडे काँग्रेस शिष्टमंडळाने तक्रार दिली होती.
राज्यपालांकडे राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत निवदेन दिले होते. पण भाजप सरकारच्या कारभारात काहीही फरक
पडला नाही. एनसीआरबीच्या अहवालातील गुन्हेगारीचे आकडे महाराष्ट्रासाठी धोक्याचे आहेत.

गृहमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधताना नाना पटोले म्हणाले, मुंबई पोलिसांचे
(Mumbai Police) जगात नाव आहे. महाराष्ट्र पोलीसांची कामगिरी पूर्वी चांगली होती. पण भाजपा सरकारच्या
काळात पोलीस दलातील सत्ताधारी पक्षांचा हस्तक्षेप गंभीर झालाय. गृहखात्याला पूर्णवेळ मंत्री नाही.
फडणवीस यांना सहा-सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद, इतर विभागाचा कारभार व पक्ष फोडाफोडीतून गृहविभागाकडे
लक्ष देण्यास वेळ नाही.

नाना पटोले म्हणाले, मुख्यमंत्री शिंदेंच्या (CM Eknath Shinde) ठाण्यात गुन्हेगारी व अवैध धंद्यांचे पेव फुटलेय.
गृहमंत्री फडणवीसांच्या नागपुरात गुन्हेगारी वाढलीय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुण्यात कोयता गँगने हैदोस
माजवलाय. पक्ष फोडून खुर्ची मजबूत करण्यातून तिघांनाही कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष देण्यास वेळ नाही.
गुन्हेगारीला वेळीच आळा घातला नाही तर परिस्थीती गंभीर होईल. आगामी हिवाळी अधिवेशनात सरकारला यावर उत्तर द्यावे लागले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena UBT | अदानी आणि सरकारला शिवसेना विचारणार जाब, १६ डिसेंबरला मुंबईत मोर्चा

Pune Crime News | ‘आमच्याकडून जागा घ्या अन् आम्हालाच भाड्याने द्या’, जागेच्या किमतीच्या 10 टक्के प्रमाणे भाडे देण्याचे आमिष दाखवून कोटीची फसवणूक

पुण्यातील जनवाडी परिसरात गुंडांची दहशत, तलवारी उगारून तीन दुकानांची तोडफोड; दोघांना अटक

Shivsena UBT | शिवसेनेचे मोदी सरकारला आव्हान, हिंमत असेल तर लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या