Pune Crime News | रुपाली चाकणकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर अश्लील पोस्ट करणारे सायबर पोलिसांच्या ताब्यात

Rupali Chakankar | obscene text on social media against state president of womens commission rupali chakankar both are in police custody

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या (NCP Ajit Pawar Group) नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या (State Commission for Women) अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्याविषयी समाजमाध्यमात (Social Media) अश्लील मजकूर प्रसारित (Obscene Content) केल्या प्रकरणी पुणे सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्लिल पोस्ट प्रसारीत करणाऱ्यांना सायबर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (Pune Crime News)

रुपाली चाकणकर यांच्या बाबतीत अश्लील शब्द लिहिलेली पोस्ट विकास सावंत (Vikas Sawant), जयंत पाटील (Jayant Patil), रणजीतराजे हात्तींबरे (Ranjitaraj Hattimbare), अमोल के. पाटील (Amol K. Patil) यांनी फेसबुकवर प्रसारीत (Facebook) केली होती. यांच्यावर पुणे सायबर पोलीस ठाण्यात आयपीसी 354 (अ) (1) (4), 509 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रुपाली चाकणकर यांचे भाऊ संतोष बबन बोराटे (Santosh Baban Borat) यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

दाखल गुन्ह्यातील जयंत पाटील, रणजीतराजे हात्तींबरे व अमोल पाटील सोशल मीडिया अकाउंट वापरणाऱ्या संशयित व्यक्तींचे मोबाईल क्रमांक सायबर पोलिसांनी प्राप्त केले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करुन संशयित जयंत रामचंद्र पाटील (रा. धनगरवाडी, जि. सांगली) याचा शोध घेतला. आरोपी सांगली येथे असल्याची माहिती मिळाल्यावर 24 नोव्हेंबर रोजी पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. तपसादरम्यान तो मानसिक रुग्ण असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला सी.आर.पी.सी प्रमाणे नोटीस (CRPC Notice) देऊन त्याचा जबाब नोंदवून मोबाईल जप्त केला.

तसेच सोशल मीडिया पोस्टवर अश्लील भाषेत कमेंट केलेल्या फेसबुक युजर Vasant Khule नावाचे अकाऊंट असलेल्या
संशयित व्यक्तीची फेसबुक कंपनीकडून तांत्रिक माहिती घेण्यात आली. पोलिसांनी वसंत रमेशराव खुळे
(वय-34 रा. रहाटी, ता.जि. परभणी) याचा शोध घेतला असता आरोप रहाटी येथे असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांच्या पथकाने 26 नोव्हेंबर रोजी रहाटी येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याला सायबर पोलीस ठाण्यात
आणून त्याचा जबाब नोंदवून घेत फोन जप्त केला. त्याला सी.आर.पी.सी प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.

याशिवाय फेसबुक युजर प्रदीप कणसे नावाने पोस्टवर अश्लील भाषेत कमेंट करण्यात आली होती.
पोलिसांनी हे फेसबुक अकाउंट वापरणाऱ्या संशयिताचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन त्याला देखील सी.आर.पी.सी प्रमाणे
नोटीस दिली आहे. सायबर पोलिसांनी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवर अश्लिल पोस्ट करणाऱ्या
आरोपींचा शोध घेऊन तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्यांचा माग काढून गुन्हा उघडकीस आणला आहे.

हि कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे
(IPS Ramnath Pokale), आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनीवास घाडगे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त आर.एन. राजे (ACP R.N. Raje), वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिनल सुपे पाटील
(Senior PI Minal Supe Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्नेहल अडसुळे
(PSI Snehal Adsule), पोलीस उपनिरीक्षक विद्या साबळे (PSI Vidya Sable), पोलीस अंमलदार संतोष जाधव,
दिनेश मरकड, श्रीकृष्ण नागटिळक, उमा पालवे, सुनिल सोनोने यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena UBT | अदानी आणि सरकारला शिवसेना विचारणार जाब, १६ डिसेंबरला मुंबईत मोर्चा

Pune Crime News | ‘आमच्याकडून जागा घ्या अन् आम्हालाच भाड्याने द्या’, जागेच्या किमतीच्या 10 टक्के प्रमाणे भाडे देण्याचे आमिष दाखवून कोटीची फसवणूक

पुण्यातील जनवाडी परिसरात गुंडांची दहशत, तलवारी उगारून तीन दुकानांची तोडफोड; दोघांना अटक

Shivsena UBT | शिवसेनेचे मोदी सरकारला आव्हान, हिंमत असेल तर लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या

Total
0
Shares
Related Posts
Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) | Pimpri Municipal Corporation owes Rs 7 crore 55 lakh to the police; The topic of discussion in the city; Property on Lease for Police Station, Chowki with Commissionerate

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) | पिंपरी महापालिकेची पोलिसांकडे 7 कोटी 55 लाख रुपयांची थकबाकी; शहरात ठरतोय चर्चेचा विषय; आयुक्तालयासह पोलीस ठाणे, चौकीसाठी मालमत्ता भाडेतत्वावर