Pune Bibvewadi Crime | इन्स्टाग्रामवर ओळख करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, बिबवेवाडी भागातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Bibvewadi Crime | इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट (Instagram Friend) पाठवून अल्पवयीन मुलीसोबत मैत्री केली. त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी (Death Threats) देऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relation) प्रस्थापित केले. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत बिबवेवाडी येथे घडला आहे. (Pune Bibvewadi Crime)

याबाबत 16 वर्षीय पीडित मुलीने बुधवारी (दि.28) बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन शिवाजी बालाजी सुर्यवंशी Shivaji Balaji Suryavanshi (वय-22 मुळ रा. देगलुर, जि. नांदेड) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर आरोपीने मुलीला भेटण्यासाठी बोलावून घेतले. तिला बिबवेवाडी येथील भाड्याच्या खोलीत घेऊन गेला. त्याठिकाणी तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक शिल्पा लंबे (API Shilpa Lambe) करीत आहेत. (Pune Rape Case)

अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन

धनकवडी : क्लासमधून बाहेर बोलावून घेत एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने किस करुन विनयभंग
केला (Molestation Case). हा प्रकार बुधवारी (दि.28) सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास धनकवडी
(Dhankawadi) येथील एका कोचिंग क्लासच्या बाहेर घडला. याप्रकरणी पीडित मुलीने सहकारनगर पोलीस ठाण्यात
(Sahakar Nagar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन रवि सुधाकर शिंदे (रा. तीन हत्ती चौक, ध्येयपूर्ती सोसायटी,
पुणे) याच्यावर आयपीसी 354, 506, पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलगी धनकवडी येथील एका कोचिंग क्लासमध्ये शिक्षण घेते. बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आरोपीने पीडित मुलीला क्लासच्या बाहेर बोलावून घेतले. मुलगी बाहेर आल्यानंतर आरोपीने जबरदस्तीने तिचे तोंड दाबून तिचा किस करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर काहीही करेन अशी धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut-Sharad Pawar-PM Narendra Modi | पवारांनी राजकारणापलिकडे जाऊन केलेली मदत मोदींनीच वारंवार सांगितली : संजय राऊत

Pune Sinhagad Road Crime | शेअर बाजार मार्गदर्शकावर शस्त्राने वार, सिंहगड रस्ता परिसरातील प्रकार

Pune PMC News | बायोमायनिंग करून मोकळया केलेल्या जागेवर पुन्हा ‘रिजेक्ट’ कचर्‍याच्या ‘लँडिफिलिंग’ची निविदा

Hemant Jogdeo | ज्येष्ठ क्रीडा पत्रकार हेमंत जोगदेव यांचे निधन

Pune Crime News | विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, तिघांवर गुन्हा दाखल