Pune Bribery Case | ससून रुग्णालयातील लाच प्रकरणानंतर मोठी कारवाई, थेट अधीक्षकांची उचलबांगडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Bribery Case | वैद्यकीय बीलाची (Medical Bills) फाईल पूर्ण करुन देण्यासाठी अडीच हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) ससून हॉस्पिटल मधील (Sasoon Hospital) अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला (Senior Clerk) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap News) सापळा रचून रंगेहाथ पकडले. हॉस्पिटलमधील लाच प्रकरणानंतर (Pune Bribery Case) ससून रुग्णालयाकडून पावले उचलली गेली आहेत.

गणेश सुरेश गायकवाड Ganesh Suresh Gaikwad (वय-49) असे लाच घेताना पकडलेल्या वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. पुणे एसीबीच्या पथकाने ही कारवाई गुरुवारी (दि.10) ससून हॉस्पिटलच्या नवीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील अधीक्षक कार्यालयात केली. तक्रारदार महिला या शासकीय सेवक आहेत. त्यांचे 1 लाख 7 हजार रुपयांचे वैद्यकीय बिलाची फाईल मंजुरीकरीता प्रलंबित होते. त्यासाठी गायकवाड याने लाच मागितली होती.

अधीक्षकांची उचलबांगडी

ससून रुग्णालयातील लाच प्रकरणात (Pune Bribery Case) लिपिकाला एसीबीने पडल्यानंतर रुग्णालय प्रशासन अ‍ॅक्शन
मोडवर आले आहे. अधीक्षक विभागाचे (Superintendent’s Department) प्रमुख असलेले अधीक्षक डॉ. यल्लापा जाधव
(Superintendent Dr. Yallapa Jadhav) यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे.
त्यांच्या जागी सूक्ष्म जीव विभागाचे (Microbiology Department) सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनील भामरे
(Dr. Sunil Bhamre) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर
(Dean Dr. Sanjeev Thakur) यांनी ही कारवाई केली आहे. एसीबीच्या कारवाईनंतर तासाभरात ही कारवाई करण्यात आली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Research on Social Media | मेंदूवर सोशल मीडियाचा निगेटिव्ह प्रभाव पडतो की नाही? लेटेस्ट रिसर्चचा दावा आश्चर्यचकित करेल तुम्हाला

Hair Loss | पुरुषांचे अकाली पडतेय टक्कल, हेयरफॉलची ‘ही’ 5 कारणं, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला, केसगळतीला लागेल ब्रेक