Research on Social Media | मेंदूवर सोशल मीडियाचा निगेटिव्ह प्रभाव पडतो की नाही? लेटेस्ट रिसर्चचा दावा आश्चर्यचकित करेल तुम्हाला

नवी दिल्ली : Research on Social Media | सध्याच्या वेगवान जगात सोशल मीडियाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे व्यासपीठ लोकांना आपले विचार, सुख-दु:ख शेयर करण्याचे माध्यम देते, परंतु अनेक वेळा त्याचे नकारात्मक परिणाम होतात. (Research on Social Media)

एका ताज्या संशोधनात हे समोर आले आहे की, सोशल मीडियाचा लोकांच्या मनावर नकारात्मक परिणाम होत नाही. हा दावा ऑक्सफर्ड इंटरनेट इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी ७२ देशांतील १० लाखांहून जास्त लोकांवर केलेल्या संशोधनाच्या आधारे केला आहे. या संशोधनाचे निष्कर्ष रॉयल सोसायटी ओपन सायन्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत. (Research on Social Media)

संशोधकांनी वर्ष २००८ ते २०१९ या कालावधीत फेसबुक वापरणाऱ्या जगातील विविध देशांतील लोकांच्या डेटाचे विश्लेषण केले. या दरम्यान असा कोणताही पुरवा सापडला नाही की, फेसबुकच्या सततच्या प्रसारामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. हे संशोधन प्रोफेसर अँड्र्यू पी आणि प्रोफेसर मॅटी वुरे यांच्या नेतृत्वाखाली ऑक्सफर्ड विद्यापीठातील एका टीमने केले. संशोधकांना सोशल मीडियाच्या वापराबाबतच्या गृहीतकाचे समर्थन करणारे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. ओआयआयने म्हटले की, फेसबुकची भूमिका केवळ आकडे पुरवण्याची होती.

नुकसानीची चर्चा काल्पनिक

रिसर्च पेपरमध्ये दावा करण्यात आला आहे की सोशल मीडियाशी संबंधित नकारात्मक मानसिक परिणामांच्या बातम्या सामान्य आहेत. यापूर्वी अनेक संशोधनांमध्ये असे दावे करण्यात आले आहेत. परंतु, हे तथ्यात्मक कमी आणि काल्पनिक जास्त आहे. रिपोर्टनुसार, या प्रोजेक्टवर संशोधकांनी कोविड-१९ महामारीपूर्वीच काम सुरू केले होते. यानंतर फेसबुकने दोन वर्षांहून जास्त काळापर्यंत डेटा उपलब्ध करून दिला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hair Loss | पुरुषांचे अकाली पडतेय टक्कल, हेयरफॉलची ‘ही’ 5 कारणं, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला,
केसगळतीला लागेल ब्रेक

Dirty Bedsheet | तुम्ही सुद्धा खुप दिवसांपासून बेडशीट धुतलेले नाही का? निष्काळजीपणा पडू शकतो महागात,
होऊ शकतात 5 मोठे आजार

Acne Pigmentation | मुरूम-फुटकुळ्या ताबडतोब होतील क्लीन बोल्ड, 5 सिम्पल फॉर्म्युले करा फॉलो,
गॅरंटीने होतील दूर