Hair Loss | पुरुषांचे अकाली पडतेय टक्कल, हेयरफॉलची ‘ही’ 5 कारणं, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला, केसगळतीला लागेल ब्रेक

नवी दिल्ली : Hair Loss | सध्या पुरुषांमध्ये केसगळतीचे प्रमाण खुप वाढले आहे. यामुळे अकाली टक्कल पडण्याच्या समस्येला त्यांना सामोरे जावे लागते. बदललेली जीवनशैली आणि आहार यास जास्त कारणीभूत आहे. दिल्लीतील सुप्रसिद्ध एंडोक्रायनोलॉजिस्ट डॉ. संजय कालरा यांनी याबाबत एका वृत्तवाहिनीला दिलेली माहिती जाणून घेऊया. (Hair Loss)

केसगळतीचे पहिले कारण –

पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचे पहिले कारण म्हणजे जेनेटिक मेक-अप. ज्या पुरुषांमध्ये पुरुष हार्मोन्स जास्त असतात, त्यांना केस गळण्याची समस्या जास्त असते. याला एंड्रो जेनेटिक एलोपेशिया म्हणतात. ज्यांच्या वडिलांना किंवा भावांना ही समस्या आहे त्यांच्यात केस गळण्याची समस्या जास्त आढळते. (Hair Loss)

केसगळतीचे दुसरे कारण –

दुसरे कारण म्हणजे न्यूट्रिशन. केसांना योग्य पोषण मिळाले नाही तर केस खराब होतात, निर्जीव होतात किंवा तुटायला लागतात. यासाठी संतुलित आहार आवश्यक आहे. आयर्न, झिंक आणि व्हिटॅमिन इ. शरीरात कमतरता असेल तर केस गळतात.

केसगळतीचे तिसरे कारण –

तिसरे कारण सायकॉलॉजिकल आहे. जर कोणी खूप तणावाखाली असेल तर त्याचे केस कमकुवत होतात आणि गळू लागतात. सध्या पुरुषांमध्ये खूप तणाव दिसून येतो.

केसगळतीचे चौथे कारण –

चौथे कारण म्हणजे हेयर केयर प्रॅक्टिसेस म्हणजे केसांची निगा राखण्याच्या पद्धती. केसांवर चुकीची जेल, तेल किंवा केमिकल लावणे, ओढणे किंवा छेडछाड करणे यामुळे केस गळतात.

केसगळतीचे पाचवे कारण –

पाचवे कारण वातावरण आहे. जर उष्णता जास्त असेल, खूप धूळ असेल किंवा खूप थंडी असेल तर याचा केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. याशिवाय जास्त प्रदूषण असलेल्या ठिकाणी सतत राहिल्याने केस खराब होऊन गळू लागतात.

अशी घ्या काळजी

  • सर्वप्रथम खाण्यापिण्याचं प्रमाण बरोबर ठेवा.
  • आहारात व्हिटॅमिन, आयर्न, झिंक इत्यादी पुरेशा प्रमाणात घ्या.
  • तणावापासून दूर राहा. तणावाचे व्यवस्थापन करा.
  • केसांमध्ये चांगल्या दर्जाचे केमिकल फ्री शॅम्पू वापरा.
  • विनाकारण केसांना केमिकल किंवा डाय लावू नका.
  • केस खराब होऊ शकतील अशा ठिकाणी जावे लागत असल्यास, केसांना टोपी इत्यादीने झाकून घ्या.
  • केसगळतीची कारणे ओळखून केसांची योग्य काळजी घ्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dirty Bedsheet | तुम्ही सुद्धा खुप दिवसांपासून बेडशीट धुतलेले नाही का?
निष्काळजीपणा पडू शकतो महागात, होऊ शकतात 5 मोठे आजार

Acne Pigmentation | मुरूम-फुटकुळ्या ताबडतोब होतील क्लीन बोल्ड, 5 सिम्पल फॉर्म्युले करा फॉलो,
गॅरंटीने होतील दूर