Pune : पुण्याच्या सदाशिव पेठेतील बिल्डरला 30 लाखांच्या खंडणीसाठी पिस्तुलाने धमकावले, शशिकांत गोलांडे अन् निलेश देशपांडेविरूध्द FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  गुंड बंडू आंदेकरची (bandu andekar pune) ओळख असल्याची धमकी देत सदाशिव पेठेतील एका बांधकाम व्यावसायिकाला (builder) धमकावत व्याजाने घेतलेले 30 लाख व त्याबदल्यात 40 लाख व्याज घेऊनही आणखी 30 लाख रुपये (Rs 30 lakh) देण्यासाठी धमकवल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी शशिकांत महादेव गोलांडे (Shashikant Mahadev Golande)(वय 76) आणि निलेश सुरेश देशपांडे (वय 47) यांच्यावर खडक पोलीस ठाण्यात IPC 384, 452, 506, 507, 34, 39, 45 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला.
याबाबत 35 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत.
2010 मध्ये त्यांनी बांधकामाला सुरुवात केली होती .
या दरम्यान 2013 त्यांची ओळख बांधकामाचे साहित्य पुरवणारे आणि व्याजाने (Interest) पैसे देणारे शशिकांत महादेव गोलांडे (Shashikant Mahadev Golande) याच्याशी ओळख झाली होती.
यानंतर त्यांनी त्यांच्याकडून साहित्य घेण्यास सुरु केली.
त्याचे ते पैसे वेळोवेळी देत होते.
मात्र 2015 मध्ये त्यांना पैशांची चणचण जाणवत होती याबाबत शशीकांत यांना समजले असता त्यांनी फिर्यादी यांना पैशांची गरज आहे का मी व्याजाने पैसे देतो, असे विचारले.
फिर्यादी यांना गरज असल्याने त्यांनी पैसे घेण्यास होकार दिला आणि 7 टक्के व्याजाने बांधकाम व्यावसायासाठी 30 लाख रुपये (Rs 30 lakh) घेतले.
महिन्याला त्याचे ते 2 लाख 10 हजार रुपये व्याज देत असत.
2018 पर्यंत त्यांनी याबदल्यात गोलांडे याला 40 लाख रुपये व्याज दिले.
तर घेतलेले 30 लाख रुपये मुद्दल देखील परत देखील केले.

जामीनावर आला होता बाहेर, पुन्हा जेलमध्ये जाण्यासाठी आता PM मोदींना दिली जीवे मारण्याची धमकी

मात्र, शशिकांत गोलांडे यांनी आणखी 30 लाख रुपयांची मागणी करून फिर्यादी यांना सतत फोन केला.
फिर्यादीस ऑफिसमध्ये बोलवून निलेश देशपांडे यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत पैसे देऊन टाकण्याची धमकी दिली.
तर एकेदिवशी फिर्यादी घरी नसताना नीलेश देशपांडे व गोलांडे हे फिर्यादीचे घरी गेले.
आरोपींनी फिर्यादीच्या आई-वडिलांना आणि मुलांना फिर्यादीस पैसे देऊन टाकण्यास सांगा असे बजावले.
निलेश याची गुंड बंडू आंदेकर आणि इतर गुंडांशी ओळख असल्याचे सांगुन ठार मारण्याची धमकी देखील दिली.
असे फिर्यादीत म्हंटले आहे.
अधिक तपास खडक पोलीस करत आहेत.