Pune Chandan Nagar Crime | पुणे : कागदपत्रे घेऊन तीन वाहनांची खरेदी, बँकेचे हप्ते न भरता फसवणूक; तिघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Chandan Nagar Crime | नवीन गाडी घेऊन देण्याचे व पैशांचे आमिष दाखवून (Lure Of Money) कागदपत्रे घेतली. कागदपत्रे बँकेला सादर करुन तीन गाड्या खरेदी करुन बँकेचे हप्ते न भरता फसवणूक केली (Cheating Fraud Case). तसेच हप्त्यांचे पैसे मागितल्यावर जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police) तीन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जुलै 2023 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत थिटे वस्ती खराडी येथे घडला आहे.(Pune Chandan Nagar Crime)

याबाबत अतुल संपत चवरे (वय-36 रा. थिटे वस्ती, खराडी, पुणे) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन आकाश पवार (वय-37 रा. नेहरुनगर पिंपरी), आरिफ शेख (वय-43रा. भवानी पेठ, पुणे), निधी पिल्ले (वय-35 रा. गणेश नगर, विश्रांतवाडी, पुणे) यांच्यावर आयपीसी 406, 420, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या नावावर नवी गाडी घेऊन देण्याच्या बदल्यात पैशांचे आमिष दाखवले. आरोपींनी फिर्य़ादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून त्यांचे व त्यांच्या पत्नीचे आधार कार्ड, पॅनकार्ड, लाईट बिल व इतर कागदपत्रे घेतली. ही कागदपत्रे बँकेत सादर करुन आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या नावावर तीन दुचाकी खरेदी केल्या. तसेच बँकेचे सर्व हप्ते भरल्याचे सांगितले. मात्र, आरोपींनी बँकेचे हप्ते भरले नाहीत.

आरोपींनी गाड्यांच्या बदल्यात फिर्यादी यांना पैसे देण्याचे आश्वासन दिले.
मात्र, प्रत्यक्षात त्यांना पैसे न देता आर्थिक फसवणूक केली.
फिर्यादी अतुल चवरे यांनी आरोपी आकाश पवार याला वेळोवेळी फोन करुन पैशांची मागणी केली.
त्यावेळी त्याने फिर्यादी यांना जिवे मारण्याची धमकी दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अतुल चवरे यांनी
पोलीस ठाण्यात जाऊन तिघांविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Swargate Crime | बनावट कागदपत्रे देऊन कारची विक्री, फसवणूक करणाऱ्या तिघांना स्वारगेट पोलिसांकडून अटक

Pune Kondhwa Crime | पुणे : कामगार महिलेसोबत गैरवर्तन, जाब विचारल्याच्या कारणावरुन मारहाण

Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून रॉड व दगडाने मारहाण, दोघांना अटक