Pune Swargate Crime | बनावट कागदपत्रे देऊन कारची विक्री, फसवणूक करणाऱ्या तिघांना स्वारगेट पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Swargate Crime | चारचाकी गाडीचे बनावट कागदपत्रे (Fake Documents) तयार केली. कागदपत्रे खरे असल्याचे भासवून गाडीची विक्री करुन तीन लाख रुपायांची फसवणूक केली (Cheating Fraud Case). याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक केली आहे. हा प्रकार 25 फेब्रुवारी रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकाजवळ घडला.

याबाबत गणेश बबन जगदाळे (वय-28 रा. खासगाव ता. परांडा जि. धाराशिव) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन आयुष अभय कुलथे (वय-25 रा. गोल्डफिंगर तमारा सोसायटी, रहाटणी, पिंपरी-चिंचवड), प्रथमेश शेटे, अतिष नागतिलक, श्रीकांत बल्लोरे, सुमित बडगुजर, प्रविण सोनवळे, आकाश सोनवळे व इतर साथीदारांवर आयपीसी 406, 419, 420, 463, 464, 467, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल करुन आयुष कुलथे, प्रथमेश शेटे व सुमित बडगुजर यांना अटक केली आहे.(Pune Swargate Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आयुष कुलथे याने फिर्यादी यांना नवनाथ खजिने असे खोटे नाव सांगितले.
त्याने त्याच नावाचे व गाडीचे खोटे व बनावट आधार कार्ड, आर.सी. बुक व इतर कागदपत्रे तयार केली.
आरोपीने चारचाकी गाडी भाड्याने घेऊन ती गाडी त्यांच्या मालकीची असल्याचे फिर्यादी यांना भासवले.
फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन खोटी कागदपत्रे देऊन ती खरी असल्याचे भासवले.
आरीपींनी फिर्य़ादी यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन बनावट कागदपत्रांद्वारे कारची विक्री करुन फसवणूक केली.
आरोपींनी इतर लोकांची असा प्रकारे फसवणूक केल्याचे फिर्यादी यांना समजले.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांना जरांगेंचे खुले आव्हान, ”तर तुमच्या ४८ पैकी एकही खासदार…”

Electoral Bonds Doners List | निवडणूक रोख्यांची माहिती उघड, देशभरात वादळ! भाजपाने देणगी रूपात घेतले तब्बल ६,०६० कोटी, काँग्रेसला…

Asim Sarode On Eknath Shinde | शिंदेंकडे गेलेले 12 आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाणार; असीम सरोदे यांचा चंद्रपूर मध्ये दावा