Pune Kondhwa Crime | पुणे : कामगार महिलेसोबत गैरवर्तन, जाब विचारल्याच्या कारणावरुन मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kondhwa Crime | महिला कामगाराचा पाठलाग करुन तिच्यासोबत गैरवर्तन केले (Molestation Case). याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या युवकाला चार जणांनी लाथाबुक्क्यांनी माराहण केली. त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या कामगारावर कात्रीने वार करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार गुरुवारी (दि.14) सकाळी अकराच्या सुमारास उंड्री (Undri) येथील अझीबुंरस बांधकाम साईटवर घडली.(Pune Kondhwa Crime)

याबाबत नारायण हिराप्पा जाधव (वय-34 रा. भुजबळ टाऊन शिपच्या जवळ, हडपसर, पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. शहजाद शहा, अकरम अली, महमुद कुरेशी व इतर अनोळखी व्यक्तीवर आयपीसी 354 (अ)(ड), 324, 506, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे काम करणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणीचा आरोपींनी बुधवारी (दि.13) पाठलाग केला. आरोपींनी यापूर्वी देखील तरुणीचा वारंवार पाठलाग केला होता. बुधवारी आरोपींनी तरुणीचा हात पकडून तु मला खुप आवडते असे म्हणून मोबाईल नंबर मागून गैरवर्तन करुन विनयभंग केला. याबाबत फिर्यादी यांना समजल्यानंतर त्यांनी आरोपींकडे जाऊन जाब विचारला.

आरोपींना याचा राग आल्याने त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी यांच्या कामावरील कामगार थावराप्पा राठोड याने मध्यस्थी केली.
त्याचा राग आल्याने आरोपीने राठोड याच्यावर कात्रीने पाठीवर मारुन गंभीर जखमी केले.
तसेच फिर्यादीला मारहाण करण्याची धमकी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे (API Lekhaji Shinde) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांना जरांगेंचे खुले आव्हान, ”तर तुमच्या ४८ पैकी एकही खासदार…”

Electoral Bonds Doners List | निवडणूक रोख्यांची माहिती उघड, देशभरात वादळ! भाजपाने देणगी रूपात घेतले तब्बल ६,०६० कोटी, काँग्रेसला…

Asim Sarode On Eknath Shinde | शिंदेंकडे गेलेले 12 आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाणार; असीम सरोदे यांचा चंद्रपूर मध्ये दावा