Pune Chaturshringi Police | चतु:श्रृंगी पोलिसांकडून तीन वाहन चोर गजाआड, 11 दुचाकी व एक रिक्षा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Chaturshringi Police | मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगारासह रिक्षा चोरणाऱ्या दोन गुन्हेगारांना चतु:श्रृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपींकडून 11 दुचाकी व एक रिक्षा असा एकूण 6 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींकडून नऊ दुचाकीचे आणि एक रिक्षा चोरीचा (Vehicle Theft) गुन्हा उघडकीस आला आहे.

कन्हैया दत्तप्रसाद पवार (वय-19 रा. कळमकर चौक, बाणेर रोड, पुणे), किशन राजेश राम (वय-20 रा. वाकड), चंद्रकांत रामा पाटेकर (वय-24 रा. थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पुणे शहरामध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील तपास पथक दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेल्या आरोपीचा शोध घेत होते. त्यावेळी श्रीकांत साबळे यांना मिळालेल्या माहिती मिळाली की, सीसीटीव्ही मध्ये दिसणारा कन्हैया पवार हा बाणेर येथील गणराज चौकात राहत आहे.

त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन अधिक चौकशी करुन आरोपीकडून 4 लाख 80 हजार रुपयांच्या 11 दुचाकी जप्त केल्या. आरोपीकडून चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील सात आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीने चोरलेल्या दुचाकी विकून मिळणाऱ्या पैशातून मौजमजा करता यावी यासाठी दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

तसेच तपास पथकाने किशन राम व चंद्रकांत पाटेकर यांना अटक करुन
त्यांच्याकडून पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या रिक्षा चोरीचा गुन्हा उघडकीस आणला.
त्यांच्याकडून दीड लाख रुपये किमतीची अॅटो रिक्षा जप्त केली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार,
अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ -4 विजय मगर,
सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी,
पोलीस निरीक्षक गुन्हे युवराज नांद्रे, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके,
प्रविण चौगुले, पोलीस अंमलदार श्रीकांत साबळे, श्रीकांत वाघवले, बाळासाहेब भांगले, बाबुलाल तांदळे,
किशोर दुशिंग, प्रदीप खरात, मारुती केंद्र, संदिप दुर्गे, सुधीर माने, इरफान मोमीन, बाबा दांगडे,
श्रीधर शिर्के, विशाल शिर्के यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar On Praful Patel | प्रफुल्ल पटेलांची 840 कोटींची केस सीबीआयने बंद केली,
आता काहीही बोलू शकतो असं त्यांना वाटतंय : रोहित पवार

Pune Police News | पुणे: पोलिस कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

Pune Dhankawadi Crime | पुणे : घराचे बनावट कुलमुखत्यारपत्र तयार केल्याप्रकरणी तिघांना अटक