Pune Cheating Fraud Case | पुणे : CBSC संचालकांचे बनावट पत्र देऊन 50 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cheating Fraud Case | सीबीएससीच्या (ट्रेनींग ऑफ स्कील कॉरपोरेशन – National Skill Development Corporation (NSDC) संचालकाचे राजमुद्रा असलेले बनावट पत्र देऊन एका व्यक्तीची तब्बल 50 लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) तीन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी ट्रेनींग आणि स्कील डेव्हलपमेंट सेंटरचे टेंडर पास करुन देण्याचे आमिष दाखवून 50 लाख रुपयांची रक्कम उकळली.

याप्रकरणी चंद्रा प्रदीप बॅनर्जी (वय – 47, रा. महाळसा लेन नं. 4, विरभद्रनगर, बाणेर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.13) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन प्रफुल्ल दत्तू पाटील Prafull Dattu Patil (वय- 45 रा.मोशी), राजेंद्र शर्मा (दिल्ली) आणि राकेश काहार (दिल्ली) यांच्यावर आयपीसी 406, 420, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Cheating Fraud Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांना सीबीएसीच्या संचालकांशी ओळख असल्याचे भासवले. अभ्यासक्रम बदलल्यावर शिक्षकांना ट्रेनिंग देण्यासाठी ट्रेनिंग आणि स्क्रील डेव्हलपमेंटचे टेंडर निघते. हे टेंडर पास करुन देण्याचे आमिष चंद्रा बॅनर्जी यांना दाखवले. यासाठी वेळोवेळी रोख 46 लाख आणि ऑनलाईन पध्दतीने 4 लाख 8 हजार रुपये घेतले.

पैसे घेतल्यानंतर आरोपींनी अशोकचक्र असलेल्या मुद्रेचे लेटरहेड त्यावर सीबीएससी
चे संचालक डॉ. बिस्वजीत सहा यांची डिजीटल सही असलेले पत्र आणि सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनचे शिक्का
असलेले टेंडरची कागदपत्रे, 11 जिल्ह्यातील शाळांच्या नावांची यादी दिली.
मात्र हे सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे चंद्रा बॅनर्जी यांच्या लक्षात आले.
आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावर फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushma andhare | सुषमा अंधारे यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, ‘त्या’ पत्रकार परिषदेतील छोट्या बाळाच्या उपस्थितीवर आक्षेप

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त