Pune Cheating Fraud Case | पुणे : MBBS प्रवेशाच्या आमिषाने 69 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cheating Fraud Case | मुलाला एमबीबीएस (MBBS) अभ्‍यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देतो, असे आमिष (Lure Of Admission In Medical College) दाखवून 69 लाख 70 हजार 742 रुपयांची फसवणूक केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपीच्‍या विरोधात विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police) गुन्‍हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत अलका टॉकीज चौकातील (Alka Talkies Chowk) भारती भवन (Bharti Bhavan) व भारती विद्यापीठ (Bhrati Vidyapeeth) परिसरात घडला आहे.

याबाबत राजेंद्र विठ्ठल बहिरट (वय-60 रा. कसबा गणपती लेन, कसबा पेठ, पुणे) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सुनिल नामदेव गडकर Sunil Namdev Gadkar (वय-32 रा. गणेश योग, आंबेगाव बु., पुणे) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील गडकर याने फिर्यादी बहिरट यांची भेट घेऊन मुलाला वैद्यकीय कॉलेजमध्ये एमबीबीएसला प्रवेश घेऊन देण्याचे खोटे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादी यांना सही केलेला कोरा चेक देऊन विश्वास संपादन केला. अॅडमीशन, फॉर्म फिलींग, इन्व्हाईस तिकीट, रजिस्ट्रेशन प्रोसेस, कॉलेज फी, डिपॉझीट अशी वेगवेगळी कारणे सांगून गडकर याने फिर्यादी यांच्याकडे पैशांची मागणी केली. (Pune Cheating Fraud Case)

आरोपीवर विश्वास ठेवून राजेंद्र बहिरट यांनी वेगवेगळ्या बँक खात्यावर ऑनलाईन 58 लाख 79 हजार 752 रुपये
तसेच रोख 10 लाख 90 हजार 990 रुपये सुनिल गडकर याला दिले.
पैसे दिल्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या मुलाचे अॅडमिशन केले नाही.
त्यामुळे त्यांनी पैशांची मागणी केली. मात्र, आरोपीने पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निंबाळकर करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushma andhare | सुषमा अंधारे यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, ‘त्या’ पत्रकार परिषदेतील छोट्या बाळाच्या उपस्थितीवर आक्षेप

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त