Pune Cheating Fraud Case | पुणे : अमेरिकेहून गिफ्ट पाठवण्याचे आमिष, महिलेची तब्बल 13 लाखाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cheating Fraud Case | अमेरिकेहून डॉलर व सोने पाठवण्याचे आमिष दाखवून महिलेकडून तब्बल 13 लाख 20 हजार रुपये उकळण्यात आले. ही घटना जुलै 2023 ते आजपर्यंत धनकवडी येथील महिलेच्या घरात ऑनलाईन पद्धतीने घडला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी फसवणुकी (Pune Cheating Fraud Case) सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत आंबेगाव पठार, धनकवडी येथे राहणाऱ्या 38 वर्षीय महिलेने रविवारी (दि.25) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून डॉ. मार्क बक्शी (Dr. Mark Bakshi) व वेगवेगळ्या बँक खातेधारकांवर आयपीसी 419, 420, 34 सह आयटी अॅक्ट 66(डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घरी असताना आरोपी याने महिलेच्या मोबाईलवर फोन केला.
तसेच व्हॉट्सअॅपवर संपर्क करुन ओळख वाढवली.
आरोपीने महिलेसाठी गिफ्ट पार्सल म्हणून अमेरिकन डॉलर व सोने पाठवण्याचे आमिष दाखवले.
गिफ्ट पार्सल प्राप्त करण्यासाठी कस्मट ड्युटी, मनी लॉड्रींग फी, डॉलर कन्व्हर्जन टू इंडियन करन्सी फि व टॅक्स भरण्यास सांगितले.
त्यानुसार फिर्यादी यांना 13 लाख 20 हजार रुपये वेगवेगळ्या खात्यात भरण्यास भाग पाडले.
मात्र नंतर फिर्यादीला समजले की आरोपी डॉ. मार्क बक्शी ने महिलेचे आर्थिक फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत नमूद
केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मंगल मोढवे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Warje Malwadi Crime | अश्लील हावभाव करुन डॉक्टर तरुणीचा विनयभंग, वारजे पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या

पिंपरी : बनावट नोटा बाळगणाऱ्या तरुणाला देहूरोड पोलिसांकडून अटक

Pune Cheating Fraud Crime | मोठी ऑर्डर देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची 40 लाखांची फसवणूक, आरोपीला कर्नाटकातून अटक; वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी