Pune Chinchwad Bypoll Election | प्रचाराच्या शेवटच्या दिवशी चिंचवडमध्ये 14 लाखांची रोकड जप्त, परिसरात खळबळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Chinchwad Bypoll Election | चिंचवडच्या दळवीनगर भागात शुक्रवारी (दि. 24) चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एसएसटी (SST) पथकाला एका वाहनातून सुमारे 14 लाख रुपयांपेक्षा अधिकची रोकड आढळून आली आहे. पुढील तपासासाठी ही संशयित रक्कम आयकर विभागाकडे (Income Tax Department) सुपूर्द करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी पथकाने केलेल्या तपासणीत हा प्रकार आढळून आला.

शुक्रवारी पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. संध्याकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंड झाल्या आहेत. याच दरम्यान चिंचवडमध्ये पुन्हा रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे. चिंचवडमध्ये भरारी पथके, अवैध रोकड तपासणारी पथके, चित्रीकरण करणारी पथके, चित्रीकरण पाहणारी आणि हिशोबाचे एक पथक आहे.

दरम्यान यापूर्वी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील दळवी नगर परिसरात निवडणूक विभागाचे
(Election Department) अधिकारी तपासणी करत होते. त्यावेळी एका कारमध्ये 43 लाख रुपयांची रोकड
(Cash) मिळून आली होती. ही रोकड शुक्रवारी (दि.10) एका गाडीत सापडली होती.
त्यानंतर आज पुन्हा याच परिसरात 14 लाखांची रोकड जप्त करण्यात आली.
याशिवाय कसबा पेठ मतदारसंघात (Pune Kasba Peth Bypoll Election) भरारी पथक आणि नाका
तपासणीत आतापर्यंत 10 लाख 53 हजार 500 रुपये जप्त (Cash Seized) केले आहेत.

Web Title :- Pune Chinchwad Bypoll Election | pune bypoll election car carrying rs 14 lakh was seized in dalvinagar in chinchwad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Paresh Rawal | ‘हेरा फेरी 3’ या चित्रपटाचा टीझर शूट संपन्न; चित्रपटात पाहायला मिळणार अनेक ट्विस्ट

Ahmadnagar Crime News | रात्री आडोशाला बसून दारू पिणे पडले महागात; काय आहे नेमके प्रकरण?