Pune Chinchwad Bypoll Election Results | 37 फेऱ्यांनतर ठरणार चिंचवडचा भावी ‘आमदार’, मतमोजणीला लागणार 14 तास

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Chinchwad Bypoll Election Results | चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे. मतमोजणीसाठी (Counting) नियुक्त करण्यात आलेल्या पर्यवेक्षक, सहायक आणि सूक्ष्म निरीक्षकांना बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले (Sachin Dhole) यांनी मतमोजणी विषयक प्रशिक्षण दिले. गुरुवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून मतमोजणीच्या(Pune Chinchwad Bypoll Election Results) 37 फेऱ्या होणार आहेत. स्व. शंकरराव गावडे भवन (Shankarao Gawde Bhavan) येथे ही मतमोजणी होत असून सायंकाळी अंतिम निकाल येऊन चिंचवडचा भावी आमदार कोण हे समजणार आहे. मतमोजणीला काही तास शिल्लक राहिल्याने उमेदवरांची धाकधूक वाढली आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (Pune Chinchwad Bypoll Election Results) 28 उमेदवार रिंगणात होते. यासाठी 510 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. मतदारसंघातील 2 लाख 87 हजार 479 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यासाठीच्या मतमोजणीची तयारी निवडणूक आयोगाने (Election Commission) केली आहे. मतमोजणीसाठी प्रत्येकी 14 टेबल अधिक टपाली मतपत्रिकेसाठी 1 टेबल असे एकूण 15 टेबल असणार आहेत. 18 पर्यवेक्षक, 18 सहायक आणि 18 सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

टपाली मतपत्रिकांसाठी (Ballot Papers) आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला टपाली आणि ईटीपीबीएसची मतमोजणी होईल. मतमोजणी सुरू होण्याच्या निर्धारित वेळेपर्यंत प्राप्त टपाली मतदानाची मोजणी करण्यात येईल. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी पर्यवेक्षक, 1 मतमोजणी सहायक आणि 1 सूक्ष्म निरीक्षक असे अधिकारी- कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर उमेदवार निहाय मतांची उद्घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी ध्वनीक्षेपकाद्वारे करतील. सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर यादृच्छिक (रँडम) पद्धतीने 5 व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाणार असून कंट्रोल युनिट वरील मतांची संख्या आणि व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठ्यांची पडताळणी केली जाणार आहे. मतमोजणी केंद्रावर माध्यम कक्ष, निवडणूक अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी थेरगाव येथील कामगार भवन शेजारील मोकळ्या जागेत वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

मतमोजणी परिसरात जमावबंदी

मतमोजणीच्या दिवशी शंकर आण्णा गावडे कामगार भवनाच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू केले आहेत.
मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या भवनाच्या 100 मीटर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.
निकाल जाहीर होईपर्यंत तापकीर चौक ते थेरगाव रुग्णालयाकडे जाणारा रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

14 तास चालणार मतमोजणी

कसबा विधानसभेच्या तुलनेत चिंचवड विधानसभा मतदारसंघ मोठा आहे. चिंचवडमध्ये 510 मतदान केंद्र आणि
28 उमेदवार आहेत. तसेच याठिकाणी 2 लाख 87 हजार 479 एवढे मतदान झाले आहे.
याशिवाय टपाली मतदानाचा देखील समावेश असल्याने चिंचवडची मतमोजणी 14 तास चालण्याची शक्यता आहे.

Web Title :- Pune Chinchwad Bypoll Election Results | kasba by election chinchwad mla will be declared after 37 rounds of counting

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nana Patole | ‘विधीमंडळाचाच नाही तर जनतेचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही’ – नाना पटोले

Pune Kasba Peth Bypoll Election Results | कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण

MP Sanjay Raut | संजय राऊत हक्कभंग प्रकरणी दोन दिवसांत चौकशी, 8 मार्चला निर्णय; राहुल नार्वेकरांची माहिती