SC, ST, OBC आरक्षण : काँग्रेस पक्षाची पुण्यात निदर्शने

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण रद्द करण्याच्या तयारीत आहे. पण आरक्षणाला धक्का दिला तर सहन करणार नाही असा इशारा काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आज सोमवारी दिला.

एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण रद्द करण्याच्या तयारीत भाजप सरकार आहे, त्याच्या निषेधार्थ पुणे शहर काँग्रेस पक्षाच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यामध्ये पक्षाचे शहर अध्यक्ष रमेश बागवे, अभय छाजेड, गोपाळ तिवारी, कमलताई व्यवहारे, वीरेंद्र किराड, अरविंद शिंदे, रजनी त्रिभुवन आदी सहभागी झाले होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावरून मोदी-शहा जोडगोळी आरक्षणे रद्द करीत असल्याचा आरोप यावेळी सभेत बोलताना वक्त्यांनी केला.

You might also like