Pune City Police | जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलिसासाठी घेण्यात आलेल्या ‘टॅलेंट शो’ स्पर्धेत API कल्याणी पाडोळे विजयी (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – 08 मार्च जागतिक महिला दिनाचे (International Woman’s Day) औचित्य साधून, पुणे शहर पोलिस (Pune City Police) विभागामार्फत महिला पोलिस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. तसेच यावेळी “बेटी बचाओ” या विषयावर पथनाट्य सादर करून समाजाला चांगला संदेश देण्यात आला. तसेच पुणे पोलीस दलातील महिला अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी “टॅलेंट शो” स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये स. पो. नि. कल्याणी पडोळे (API Kalyani Padole) यांनी विजेतेपद पटकावून मानाचा मुकुट मिळवला आहे तर त्यांच्यापाठोपाठ प्रथम क्रमांक वर्षा ठोंबरे (Varsha Thombre), द्वितीय क्रमांक पूजा गवळी (Pooja Gavli), व तृतीय क्रमांक जान्हवी भडेकर (Janhvi Bhadekar) यांनी मिळवला आहे. (Pune City Police)

 

 

हा भव्य असा कार्यक्रम पुणे शहर पोलिस दलामार्फत शिवाजीनगर मुख्यालय येथील रेक्रिएशन हॉल येथे घेण्यात आला असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे पोलीस आयुक्त यांच्या धर्मपत्नी जुगनु अमिताभ गुप्ता (Jugnu Amitabh Gupta) होत्या. अपर पोलीस आयुक्त प्रशासन यांच्या धर्मपत्नी पूनम जालिंदर सुपेकर (Poonam Jalinder Supekar), अपर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) यांच्या धर्मपत्नी स्वाती रामनाथ पोकळे (Swati Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त (परिमंडळ – 04) यांच्या धर्मपत्नी तेजश्री रोहिदास पवार (Tejashree Rohidas Pawar), पोलीस उप आयुक्त (आर्थिक व सायबर) भाग्यश्री नवटक्के (IPS Bhagyashree Navtake),

 

 

पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – 05 नम्रता पाटील (DCP Namrata Patil) , पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – 03 पोर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad) ,
सहायक पोलिस आयुक्त (स्वारगेट विभाग) सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan), सहायक पोलिस आयुक्त, (कोथरूड विभाग) रुक्मिणी गलांडे (ACP Rukmini Galande),
सहायक पोलिस आयुक्त (प्रशासन) आरती बनसोडे (ACP Arti Bansode)
या सर्व वरिष्ठ महिला अधिकारी तसेच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या पत्नी, पुणे पोलीस दलातील (Pune City Police)
महिला पोलिस निरीक्षक (Lady Police Inspector), महिला सपोनि, महिला पोलिस उपनिरीक्षक,
व महिला कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय या कार्यक्रमांत उपस्थित झाले होते.

 

 

उपस्थित मान्यवरांनी, या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या कलेचे विशेष कौतुक करून त्यांना बक्षीसे दिली आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीएसआय सुप्रिया पंढरकर (PSI Supriya Pandharkar) यांनी केले,
तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक हडपसर वाहतूक विभागाच्या (Hadapsar Traffic Division) पोलिस निरीक्षक मनिषा झेंडे (Police Inspector Manisha Zande) यांनी केले तसेच कार्यक्रमास अधिक रंगत बनवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत खळखळून हसत ठेवण्याचे काम आर. जे. बंड्या यांनी केले,
तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पीएसआय चित्रा वाघमारे (PSI Chitra Waghmare) यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.

 

Web Title :- Pune City Police | API Kalyani Padole wins Talent Show competition for women police on the occasion of International Women’s Day

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा