Pune Congress | सोनिया गांधी यांचा वाढदिवस वृद्धांसोबत केक कापून साजरा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Congress | काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि मोहन जोशी (Mohan Joshi) यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या (Congress OBC Cell) पुणे शहर (Pune Congress) उपाध्यक्ष अ‍ॅड. मोनिका खलाने (Adv. Monica Khalane) यांनी पुण्यातील ‘मातोश्री वृद्धाश्रम’ (Matoshree Vruddhashram) येथे सर्व वृद्ध आजी आजोबांसोबत केक कापून साजरा केला. यावेळी आजी- आजोबांना अल्पोपहार देण्यात आला.

यावेळी बोलताना खलाने म्हणाल्या, गांधी कुटुंबीयांनी देशाची सेवा स्वत:च्या प्राणांची आहुती देऊन केली आहे. सोनिया गांधी यांच्या त्यागाची भूमिका ही खूपच मोठी गोष्ट आहे, त्यामुळे आज सोनिया गांधी यांचा वाढदिवस हा वृद्ध आजी आजोबांसोबत साजरा करण्याचा माझा मानस होता. सिंहगड रोड येथील ‘मातोश्री वृद्धाश्रम’ येथे सर्व आजी आजोबांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला.

यावेळी या सर्व आजी आजोबांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खूप मोठा होता.
माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीने सोनिया गांधी यांचा वाढदिवस साजरा केला.
त्यामुळे या सर्व आजी आजोबांचे आशीर्वाद सोनिया गांधी यांना मिळणार आहेत.
माझ्याकडून देखील सोनिया गांधी यांना दीर्घायुष्य, निरोगी आयुष्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करते,
असे मनोगत खलाने यांनी व्यक्त केले.

Web Title :- Pune Congress | Celebrating Sonia Gandhi’s birthday by cutting cake with elders

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update