Ajit Pawar | शाई फेकली म्हणून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांवर अद्याप गुन्हा का नाही? – अजित पवार

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी पिंपरी चिंचवड येथे समता सैनिक दलाच्या एका कार्यकर्त्याने शाई फेकली. मनोज भास्कर घरबाडे असे शाई फेकणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मनोजला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर भा. द. वि. 307 अंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यावरुन राज्यातील विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रवादीचे नेते, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. शाई फेकणाऱ्या तरुणावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. मात्र, राज्यात महापुरुषांचा आणि स्त्रियांचा अपमान करणाऱ्यांवर कोणताही गुन्हा अद्याप दाखल झालेला नाही, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.

कोणावरही शाई फेकणे चुकीचे आहे. मी त्याचे समर्थन करत नाही. पण चंद्रकांत पाटील यांनी शाळा आणि महाविद्यालयांना देण्यात येणाऱ्या निधीवरुन भीक मागा अशी सूचना केली, ती अयोग्य आहे. शाईफेक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, पण महाराष्ट्रातील महापुरूषांचा अपमान करणाऱ्या राज्यापालांवर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. स्त्रियांबद्दल अपमानकारक वक्तव्ये करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर गुन्हा दाखल केला जात नाही, असे पवारांनी (Ajit Pawar) नमूद केले.

शाई फेकीच्या घटनेनंतर पोलिसांवर कोणतीही कारवाई करु नका, असे पाटील म्हणाले होते.
पण 10 पोलिसांवर या प्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली. बातमीसाठी पत्रकार कॅमेरे चालू ठेवतात.
आणि अशा घटनांना प्रसिद्धी मिळते. पण शाई फेकीची चित्रफीत समाज माध्यमांवर आणि वाहिन्यांवर प्रसिद्ध केली,
त्यासाठी पत्रकारांवर देखील कारवाई करण्यात आली, हे अयोग्य आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन भाजप सत्तेत आले.
पण, शिवाजी महाराजांच्या अपमानावर ते रस्त्यावर उतरले नाहीत.
निवडणुकीत विजय मिळाल्यावर त्यांनी रस्त्यावर येऊन पेढे वाटले.
भाजपची ही दुटप्पी भूमिका आहे आणि ती योग्य नाही, असे पवार यावेळी म्हणाले.

Web Title :- Ajit Pawar | attempt to murder case register on bhaskar garbade butthere no crime against the governor bjp leaders for insulting legends said ajit pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pankaja Munde | छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाच्या मुद्यावरून पंकजा मुंडे गोपिनाथ गडावर अर्धातास मौन पाळणार

Jitendra Awhad | ‘शाईफेक करणार्‍यावर 307 चा गुन्हा योग्य नाही’ – जितेंद्र आव्हाड