Pune Congress News | पुणे काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर, विद्यार्थी संघटनेच्या नियुक्तीवरुन काँग्रेस भवनमध्ये राडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Congress News | विद्यार्थी संघटनेच्या नियुक्तीवरुन काँग्रेस भवन येथे राडा झाला आहे. विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून विद्यार्थी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.3) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास काँग्रेस भवन पक्ष कार्यालयाच्या आवारात घडला आहे. (Pune Congress News)

याबाबत विद्यार्थी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल संभाजी पिसाळ यांनी रविवारी (दि.4) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख (वय-35), भुषण रानभरे (वय-30), युवराज नायडु (वय-35), राज जाधव (वय-28) यांच्यावर आयपीसी 324, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे शहरातील कॅम्पस अध्यक्ष पदावरुन विद्यार्थी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अभिजीत गोरे आणि विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांच्यात वाद झाला. अभिजीत गोरे यांना जिल्ह्यातील संघटनेचे पदे वाटप, नियुक्ती करण्याचा अधिकार आहे. मात्र, गोरे यांच्या ऐवजी प्रदेशाध्यक्ष अमिर शेख आणि कोथरुड विभागाचे माजी अध्यक्ष राज जाधव यांनी भारती विद्यापीठ कॅम्पस, कोथरुड अध्यक्षपद एका विद्यार्थ्याला दिले. त्यामुळे या पदावरुन वाद झाला होता.

शनिवारी प्रफुल्ल पिसाळ हे काँग्रेस भवन येथे गेले होते. त्यावेळी अमीर शेख 30-40 कार्यकर्त्यांसहे काँग्रेस भवन येथे
हजर होते. त्यावेळी पिसाळ यांनी अमीर शेख यांना मिटवून घ्या असे सांगितले. याचा राग आल्याने अमिर शेख यांनी
पिसाळ यांना शिवीगाळ केली. त्यावेळी त्याठिकाणी असलेल्या युवराज नायडू याने त्याच्या हातातील कडे काढून
पिसाळ यांच्या डोक्यात मारले. राज जाधव यांनीही पिशाळ यांच्या तोंडावर मारहाण केली.

अमीर शेख यांनी पिसाळ यांच्या छातीवर मारले तर भुषण रानभरे यांनी विटांनी पिसाळ यांच्या पाठीवर मारले.
तसेच धमकीही दिली, असे प्रफुल पिसाळ यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह 4 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पानकर करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gangster Hemant Dabhekar Meet Srikant Shinde | गँगस्टर शरद मोहोळचा राइट हॅन्ड पोहोचला ‘वर्षा’वर, कुख्यात गँगस्टरने घेतील खासदार श्रीकांत शिंदेंची भेट

Pune Police PSI Suspended | पुणे विद्यापीठातील ललित केंद्रामध्ये झालेल्या गोंधळानंतर पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन

पुणे : मॅट्रिमोनी साइटवरील ओळख तरुणीला पडली महागात, लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

Nagpur Crime News | पंतप्रधानांच्या बॅनरचे विद्रुपीकरण युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाला अटक; काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी केला निषेध, काँग्रेसकडून कुणाल राऊत यांना घरचा आहेर

पुण्यात नात्याला काळीमा! अल्पवयीन पुतणीवर बलात्कार, गर्भपात केल्याप्रकरणी चुलत्याला अटक