Pune Corona | गेल्या 24 तासात पुणे शहरात ‘कोरोना’चे 100 रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corona | पुणे शहरात कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत आहे. शहरामध्ये नवीन रुग्ण आणि बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये चढ-उतार पहायला मिळत आहे. बुधवारी पुणे शहरातील विविध तपासणी केंद्रावर 6 हजार 102 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 100 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 97 रुग्णांनी कोरोनावर (Pune Corona) यशस्वी मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे महानगर पालिकेच्या (Pune Corporation) आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी चार वाजेपर्यंत शहरामध्ये 100 रुग्णांचे निदान (Pune Corona) झाले आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 लाख 07 हजार 348 इतकी झाली आहे. तर आज दिवसभरात 97 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 4 लाख 97 हजार 467 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

शहरात सध्या 776 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या शहरामध्ये 84 रुग्ण गंभीर आहेत. गेल्या 24 तासात शहराबाहेरील 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज शहरातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. शहरात आजपर्यंत 9105 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Web title : 100 patients of Corona in Pune city in last 24 hours; Learn other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | कुबेर शक्ती मल्टी पर्पज इंडिया निधी लिमीटेडकडून 100 जणांची फसवणूक; पुणे पोलिसांकडून शिरीष खरात याला नाशिकहून अटक

PM Kisan | ‘या’ शेतकर्‍यांना मिळणार नाहीत 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये, जाणून घ्या सरकारचे नवीन नियम

Gold Silver Price Today | सोन्याच्या भावात घसरण तर चांदी वधारली; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | कात्रज परिसरातील 4 सोसायटयांमधील फ्लॅट फोडले

Gold Price Today | महाग झाले सोने, चांदी झाली स्वस्त; जाणून घ्या आजचा नवीन दर