Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 185 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Pune Corona) संख्या अडीच हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 185 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 237 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 88 हजार 478 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 77 हजार 285 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 07 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8802 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 2391 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 2391 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 206 रुग्ण गंभीर आहेत.
तर 360 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 9766 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 29 लाख 27 हजार 106 तपासणी करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

Web Title : Pune Corona | 185 new patients of ‘Corona’ in Pune city in last 24 hours, find out other statistics

BJP MLA | ज्येष्ठ BJP कार्यकर्त्याच्या घरी आमदाराची टर उडवणारी टिपणी; थेट चंद्रकांत पाटील, मुनगंटीवारांकडे तक्रार

Pune Crime | पुण्यात व्यावसायिकावर गोळीबार करुन लुटले

Khel Ratna Award |….म्हणून बदललं राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव; PM मोदींनी सांगितलं ‘हे’ कारण