Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 197 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 197 नवे रूग्ण आढळले आहेत. दिवसभरात 222 रूग्ण आजारातून बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात 24 तासात 12 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 6 जण हे पुणे महापालिकेच्या (Pune Corona) बाहेरील आहेत.

पुण्यात सध्या कोरोनाचे 2 हजार 77 सक्रिय रूग्ण आहेत. त्यापैकी 209 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पुण्यातील एकुण बाधितांची संख्या 4 लाख 91 हजार 862 वर जाऊन पोहचली आहे. त्यापैकी 4 लाख 80 हजार 900 रूग्ण हे बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे पुणे शहरात आजपर्यंत 8 हजार 885 जणांचा मृत्यू झाला आहे. आज गेल्या 24 तासात 7 हजार 619 जणांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यापैकी 197 जणांचा कोरोना अहवाल हा सकारात्मक आला आहे.

हे देखील वाचा

Unicef New Report | युनिसेफ रिपोर्ट : भारतासह जगातील 1 बिलीयन मुलांना जलवायु परिवर्तनाचा गंभीर धोका

Social Media | PAK मधून समोर आला लज्जास्पद Video, तरुणाने चालत्या रिक्षात घुसून महिलेला केले KISS (व्हिडीओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Corona | 197 new corona patients in Pune in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update