Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 304 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पुणे शहरामध्ये (Pune Corona) कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे (Recover Patient) प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची संख्या अधिक असून आज तीनशेच्यावर रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 304 नवीन रुग्णांची नोंद (Pune Corona) झाली आहे. तर 196 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 86 हजार 669 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 75 हजार 324 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 07 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8756 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात 2589 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

आज दिवसभरात शहरातील खासगी आणि शासकीय स्वॅब तपासणी केंद्रावर 7775 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत पुण्यामध्ये 28 लाख 65 हजार 869 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत.
शहरामध्ये सध्या 2589 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (active patient) आहेत.
त्यापैकी 226 रुग्ण गंभीर आहेत तर 338 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

 

Web Title : Pune Corona | 304 new patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Vehicle charging station | राज्यात 100 व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी सरकारकडून महावितरणला ‘लेटर’

PMRDA विकास आराखड्याचे प्रारूप मान्य, नागरिकांच्या सुचना व हरकती मागविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

WhatsApp ला टक्कर देण्यासाठी भारताचे स्वत:चे Sandes अ‍ॅप, जाणून घ्या कसे करते काम