Pune : कोरोनाबाधितांना आधार आणि उपचाराची गरज – विक्रम आल्हाट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागिल वर्षभरापासून कोरोना महामारीने जगाला वेठीस धरले आहे. दिवाळीच्या दरम्यान कोरोनाची पहिली लाट ओसरली आणि फेब्रुवारी अखेरीस पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आणि हाहाकार माजला. कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वाढत गेली, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि रेमडिसिव्हर मिळविताना रुग्णांच्या नातेवाईकांची दमछाक होत होती. कोरोनाबाधितांना आधार आणि उपचार देण्यासाठी डॉक्टरांनी जीवाची बाजी लागवली. कोरोनाच्या संकट काळामध्ये फ्रंटलाइन म्हणून समाजातील सर्वच घटकांनी महत्त्वाची भूमिका बजावली, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. रुग्णांना धीर देण्यासाठी नातेवाईकांसह सर्वांनीच पुढे आले पाहिजे, असे मत सिद्धार्थ तरुण मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार विक्रम आल्हाट यांनी व्यक्त केले.

हडपसरमधील सिद्धार्थ तरुण मंडळ सिध्दार्थ बुध्द विहार व माता रमाई महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जंयती साजरी करण्यात आली.

यावेळी आल्हाट यांचा हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी बुध्द विहार कमिटीचे अध्यक्ष सचिन आल्हाट, उपाध्यक्ष विवेक आल्हाट, रुपेश आल्हाट, अमित कांबळे, सुभाष आल्हाट, विजय आल्हाट, मनिष आल्हाट, सनी आल्हाट, सचिन रणपिसे, आकाश कांबळे, अभिजीत संकपाळ, गौतम आल्हाट, वेदांत आल्हाट, श्रेयश आल्हाट, सतिश आल्हाट, रवि संकपाळ, रेखा गायकवाड, विशाखा आल्हाट, यश आल्हाट, आदित्य आल्हाट, गौरख शेलार, राजवीर आल्हाट उपस्थित होते. सुहास आल्हाट यांनी आभार मानले.