Pune Coronavirus News : अत्यंत चिंताजनक ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 425 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 7 जणांचा मृत्यू, काळजी घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होत नसल्याने पुणे शहरात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. पुणे शहरात बुधवारी (दि.17) 428 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 262 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (बुधवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 4 हजार 304 स्वॅब तपासणी करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 145 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज दिवसभरात सात रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 हजार 806 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 1 हजार 881 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 95 हजार 924 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 89 हजार 237 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 93 हजार 869 रुग्णांपैकी 3 लाख 79 हजार 976 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 4 हजार 835 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 58 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.47 टक्के आहे.