Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तसात 2790 रूग्ण ‘कोरोना’मुक्त, 648 नवे पॉझिटिव्ह

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   मागील काही महिन्यात पुणे शहरामध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार मांडला होता. शहरात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने रुग्णांच्या संख्येत विक्रमी भर पडत होती. मात्र, मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत असून पुणे शहराने कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु केल्याचे पहायला मिळत आहे. पुणे शहरामध्ये मागिल दोन महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या आज (सोमवार) नोंदवण्यात आली आहे. पुण्यात गेल्या 24 तासात केवळ 684 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची देखील संख्या कमी झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 59 हजार 987 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 66 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 43 रुग्ण शहरातील आहेत तर 23 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 7 हजार 749 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 2 हजार 790 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 4 लाख 33 हजार 798 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज (सोमवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7 हजार 862 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 18 हजार 440 इतकी आहे. यापैकी 1402 रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 69 हजार 480 रुग्णांपैकी 8 लाख 76 हजार 480 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 77 हजार 759 आहे. कोरोनाबाधित एकूण 15 हजार 241 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.57 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 90.41 टक्के आहे.