Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासांत ‘कोरोना’चे 494 नवीन रूग्ण, 1410 जणांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून घट होत असल्याचे दिसून येत आहे. मागील चार दिवसांमध्ये पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या एक हजाराच्या खाली आली आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. नवीन रुग्णांच्या तुनलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरातील रुग्णसंख्या पाचशेच्या खाली आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. शहरात गेल्या 24 तासात 494 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करुन माहिती देताना सांगितले की, पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 494 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर आज दिवसभरात शहरामध्ये विविध केंद्रावर 7 हजार 582 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. शहरात आज 1 हजार 410 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यंना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहीती महापौरांनी दिली. पुणे शहरात मागील काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 95 हजार 524 रुग्णांपैकी 9 लाख 33 हजार 99 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 46 हजार 428 आहे. कोरोनाबाधित एकूण 15 हजार 597 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.61 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 93.73 टक्के आहे.